Latest Post

बुलडाणा - 22 ऑक्टोबर
मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे कृत्य आपल्या गोपनीय मतदानाचा भंग आहे व हे गैर कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल कण्यात यावा अश्या आशयची बातमी 21 ऑक्टोबर रोजी "बिनदास न्यूज़" कडून येताच प्रशासन सतर्क झाला व या प्रकारणी अज्ञात व्यक्तिवर बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
       21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान बुलडाणा- 22 मतदार संघात मतदानाच्या दिवशी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले व यात काही व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला, बसपा उमेदवाराला तर शिवसेना उमेदवाराला मत दिल्याचं दिसते.
       निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही काही मतदारांनी आदेशाला खो दिला आहे.अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी "बिनदास न्यूज़" ने बातमीच्या माध्यमाने या गंभीर मुद्द्यावर प्रशानाचे लक्ष वेधले असता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.बुलढाणा-22 निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या निर्देशावर नायब तहसीलदार अमरसिंह वामन पवार यांनी आज बुलडाणा शहर ठाण्यात जावून तक्रार दिली त्यात नमूद केले की अज्ञात मतदारने मतदानाचा हक्क गोपनिय पध्दतीने बजावण्या ऐवजी जाहिर मतदान करण्याचा प्रकार उघड करुण आदर्श आचार सहितेचा भंग केल्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध लोकप्रतिनिधि कायदा 1951 आणि 1988 चे कलम 128 व भादवी चे कलम 188 अन्वय गुन्हा दाखल कण्यात आला आहे.पुढील तपास शहर ठानेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई करुनाशिल तायडे करीत आहे.

बुलडाणा - 21 ऑक्टोबर
महाराष्ट्रात विधानसभा साठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या वरुण सिद्ध होते की मतदान केंद्रवार कार्यरत पुलिंग पार्टी किती सतर्क होते.
      आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.बुलडाणा- 22 मतदार संघात एकूण 7 उमेदवार मैदानात आहे त्यापैकी कांग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना कडून संजय गायकवाड तर वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यात खरी लडत मानल्या जात आहे.आज दुपार नंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर समोर आले व यातील 5 व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला मत दिल्याचं स्पष्ट दिसून येताय तर एका व्हिडिओत बसपा उमेदवाराला मत दिल्याचं दिसते. अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्यावर आता निवडणूक विभाग काय कार्यवाही करणार? हे बघावे लागेल.

महात्मा गांधींच्या च्या 150 व्या जयंती निमित्त नयी तालीम या विषयाअंतर्गत सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात असताना,राष्ट्रीय सेवा योजने(NSS)  च्या माध्यमातून महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले त्यात श्रीरामपूर शहरातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात NSS च्या विद्यार्थ्यांनि देखील शिरसगाव या दत्तक गावी जाऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम गावात विविध ठिकाणी राबवली,त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,तसेच ग्रामीण रुग्णालय शिरसगाव अश्या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले.
या सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालया च्या प्राचार्य सौ.संघमित्रा राजभोज,उप प्राचार्या सौ.कवडे मॅडम,प्रा.ज्योती शिंदे,आणि विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी अ‍ॅड.प्रा.उज्वल मानकर यांनी विशेष प्रयत्न केले,त्याच बरोबर अ‍ॅड.प्रा.मुंगसे मॅडम,प्रा.गायकवाड सर मानद विश्वस्त सौ.मानसी करंदीकर मॅडमअ‍ॅड.प्रा.बिंगी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी झाल्या नंतर कार्यक्रम अधिकारी प्रा.उज्वल मानकर सर यांनी ग्रामपंचायत शिरसगाव, ग्रामीम रुग्णालया शिरसगाव यांचे आभार मानले.
या सदर च्या कार्यक्रमात रुग्णालयाचे  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचे समन्वयक प्रसन्न धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही बद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई : मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे टक्कर देणार आहेत. इंजीन धडधडत राहण्यासाठी येथे संधी असल्याने मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बालेकिल्ल्यात भगवा फडकत ठेवण्यासाठी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.२००९ विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई येथे आमदारपदी निवडून आले. त्या वेळेस शिवसेनेचे उमेदवार आदेश बांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये काँग्रेसवारी करून पक्षात परतलेले सदा सरवणकर येथे आमदारपदी निवडून आले. मनसेला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदारसंघात अवघे चार उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक आणि अपक्ष उमेदवार मोहनीश राऊळ मैदानात असले तरी खरी लढत सरवणकर आणि देशपांडे यांच्यात रंगणार आहे.जमेच्या बाजूविद्यमान आमदार असून मतदारसंघात भक्कम बांधणी. २००९ मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवूनही शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळवली.लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे ९१ हजार ६३५ मते माहीम मतदारसंघातून मिळाली.मनसेच्या खळ्ळ्खट्याक आंदोलनामुळे चर्चेतला चेहरा. तरुण मतांसाठी सेलीब्रिटींची फौज प्रचारासाठी मैदानात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, दांडगा जनसंपर्क. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेची हवा सरल्यानंतरही नितीन सरदेसाई यांना दुसºया क्रमांकाची मते होती.उणे बाजूमनसे स्पर्धेत असल्याने मराठी मतांची विभागणी होणार आहे़ अन्य ठिकाणी मनसेची पिछेहाट झाली तरी येथे समर्थकांची संख्या मोठी आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता. पार्किंगची समस्या आणि जुन्या इमारतींचा प्रश्न रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची तुलनेने मोठी फौज, महापालिका निवडणुकीत माहीम मदारसंघात पूर्ण सफाया, लोकसभा निवडणुकीत हवा निर्माण करूनही मनसेचा प्रभाव दिसून आला नाही. युतीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला, तीच हवा कायम राहिल्यास मनसेला मते फिरवणे अवघड जाईल.

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे 13 ऑक्टोबरला दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास 16 हजार 485 कर्मचार्‍यांपैकी 253 गैरहजर कर्मचार्‍यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणात 16 हजार 171 कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्ह्यातील 12 मतदारसंघनिहाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचारी व अनुपस्थित कर्मचार्‍यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अकोले मतदारसंघातील दुसर्‍या प्रशिक्षणासाठी 1 हजार 402 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 375 कर्मचारी सहभागी झाले तर 27 कर्मचारी गैरहजर होते. संगमनेरमध्ये 1 हजार 224 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 216 कर्मचारी सहभागी झाले होते. 8 कर्मचारी गैरहजर होते. शिर्डी मतदारसंघात 1 हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1176 कर्मचारी सहभागी झाले होते. 19 कर्मचारी गैरहजर होते.कोपरगाव मतदारसंघात 1 हजार 194 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पैकी 1 हजार 183 कर्मचारी सहभागी झाले तर 11 कर्मचारी गैरहजर होते. श्रीरामपूरमध्ये 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 343 कर्मचारी सहभागी झाले होते. 21 कर्मचारी गैरहजर होते. नेवासा मतदारसंघात 1 हजार 184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 172 कर्मचारी सहभागी झाले तर 12 कर्मचारी गैरहजर होते. पाथर्डी-शेवगावमध्ये 1592 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1555 कर्मचारी सहभागी झाले होते. 37 कर्मचारी गैरहजर होते. राहूरीमध्ये 943 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 905 कर्मचारी सहभागी झाले, तर प्रशिक्षणाला 38 कर्मचारी गैरहजर होते.पारनेर मतदारसंघात 2 हजार 38 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1994 कर्मचारी सहभागी झाले होते. 22 कर्मचारी गैरहजर होते. नगर शहर मतदारसंघात 1 हजार 272 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1254 कर्मचारी सहभागी झाले होते. 18 कर्मचारी गैरहजर होते. श्रीगोंदा मतदारसंघात 1 हजार 516 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पैकी 1 हजार 485 कर्मचारी सहभागी झाले होते. 28 कर्मचारी गैरहजर होते. कर्जत-जामखेडमध्ये 1 हजार 556 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 513 सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते.

श्रीरामपूर : सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतक-यांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील मांजरी, टाकळीमियॉ, देवळालीप्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे आयोजित जाहीर सभांमध्ये मुरकुटे बोलत होते. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मत धुमाळ, माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गणेश भाकरे उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले, राहुरी तालुक्यातील ३२ गावांमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या हक्काचा आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून कांबळे यांची निवड करण्यात आली. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे या भागाचे वाटोळे झाले. उसाची शेती उदध्वस्त होऊन राहुरी कारखाना बंद पडला. त्याचा परिणाम देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठ ओस पडण्यात व कामगारांचे प्रपंचाची धूळधाण होण्यात झाला. विखे यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरु झाला तरी पाटपाण्याच्या अशाश्वतेमुळे भवितव्य टांगणीवरच आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस उमेदवार लहू कानडेंवर टीका केली. विखे व मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आपल्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र आमदारकीच्या काळात आपण भरीव विकास कामे केली. विकासासाठीच आपण सेनेसोबत आलो असून, येथील नेत्यांची भक्कम साथ आहे, असे ते म्हणाले. यावेळी किसनराव बडाख, अच्युतराव बडाख, निवृत्ती बडाख, गणपतराव कोल्हे, नामदेव बडाख, लक्ष्मण बडाख, ज्ञानेश्वर बडाख, दीपक बडाख, जालिंदर बडाख, हरिभाऊ बडाख उपस्थित होते

बुलढाणा - 17 अक्तुबर, कासिम शेख
बुलढाणा जिला अंतर्गत के ग्राम धाड के एक 20 वर्षीय युवक कांग्रेस पार्टी की टी-शर्ट पहनकर एक पेड़ से फांसी लगाकर झूलता हुआ आज 17 अक्तुबर को नजर आने के बाद इलाके में खलबली मची हुई है बता दें कि 13 अक्टूबर को भी बुलढाणा जिले के ग्राम खातखेड़ में भी एक युवक ने भाजपा की टीशर्ट पहन कर आत्महत्या कर ली थी  मृतक युवक का नाम सतीश मोरे है जिसने चिखली विधानसभा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस प्रत्याशी राहुल बोंद्रे के समर्थन में तैयार की गई टी-शर्ट पहन रखी है जिस पर कांग्रेस का चुनावी निशान "पंजा" और "मी राहुल भाऊ समर्थक" (मैं राहुल भाऊ का समर्थक) ऐसा लिखा हुआ है. यह मामला प्रकाश में आने के बाद तत्काल पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए धाड़ के ग्रामीण अस्पताल में भेज दिया है. बता दे कि विगत 13 अक्तुबर को बुलढाणा जिले के जलगांव जामोद विधानसभा निर्वाचन क्षेत्र के ग्राम खातखेड़ निवासी राजू तलवारे ने भी एक पेड़ से फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी और खास बात तो यह है कि इसी दिन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस घटनास्थल से कुछ किलोमीटर दूरी पर भाजपा प्रत्याशी डॉ. संजय कुटे कर प्रचार के लिए जनसभा को संबोधित करने के लिए आने वाले थे. प्राथमिक रूप से ये जानकारी सामने आई है कि,मृतक सतीश मोरे निजी कर्ज़ के बोझ तले दबे हुआ था जिस से वे काफी परेशान था.जो कल से घर निकला था पर रात भी घर नही लौटा और आज सुबह उसका शव पेड़ से लटका हुआ नजर आया.बुलढाणा जिले में पहेले भाजपा और अब कांग्रेस की टीशर्ट पहनकर आत्महत्या की इन दोनों घटनाओं से जिले भर के राजकीय माहौल में उबाल देखने को मिल रहा है.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget