अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त जिल्ह्यातील कर्मचार्यांचे 13 ऑक्टोबरला दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास 16 हजार 485 कर्मचार्यांपैकी 253 गैरहजर कर्मचार्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणात 16 हजार 171 कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्ह्यातील 12 मतदारसंघनिहाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचारी व अनुपस्थित कर्मचार्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अकोले मतदारसंघातील दुसर्या प्रशिक्षणासाठी 1 हजार 402 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 375 कर्मचारी सहभागी झाले तर 27 कर्मचारी गैरहजर होते. संगमनेरमध्ये 1 हजार 224 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 216 कर्मचारी सहभागी झाले होते. 8 कर्मचारी गैरहजर होते. शिर्डी मतदारसंघात 1 हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1176 कर्मचारी सहभागी झाले होते. 19 कर्मचारी गैरहजर होते.कोपरगाव मतदारसंघात 1 हजार 194 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पैकी 1 हजार 183 कर्मचारी सहभागी झाले तर 11 कर्मचारी गैरहजर होते. श्रीरामपूरमध्ये 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 343 कर्मचारी सहभागी झाले होते. 21 कर्मचारी गैरहजर होते. नेवासा मतदारसंघात 1 हजार 184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 172 कर्मचारी सहभागी झाले तर 12 कर्मचारी गैरहजर होते. पाथर्डी-शेवगावमध्ये 1592 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1555 कर्मचारी सहभागी झाले होते. 37 कर्मचारी गैरहजर होते. राहूरीमध्ये 943 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 905 कर्मचारी सहभागी झाले, तर प्रशिक्षणाला 38 कर्मचारी गैरहजर होते.पारनेर मतदारसंघात 2 हजार 38 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1994 कर्मचारी सहभागी झाले होते. 22 कर्मचारी गैरहजर होते. नगर शहर मतदारसंघात 1 हजार 272 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1254 कर्मचारी सहभागी झाले होते. 18 कर्मचारी गैरहजर होते. श्रीगोंदा मतदारसंघात 1 हजार 516 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पैकी 1 हजार 485 कर्मचारी सहभागी झाले होते. 28 कर्मचारी गैरहजर होते. कर्जत-जामखेडमध्ये 1 हजार 556 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 513 सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते.
Post a Comment