तरुणाकडून प्रवरासंगम येथे दोन काडतुसांसह गावठी कट्टा जप्त,नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या वैजापूरच्या तरुणास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 4 जून रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना प्रवरासंगम बसस्टॅण्ड येथे एक मध्यम बांध्याचा तरुण देशी बनावटीचा कट्टा व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक कटके यांनी विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार दत्तात्रय गव्हाणे ,मनोज गोसावी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे व चालक हवालदार संभाजी कोतकर यांना सदर इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे प्रवरासंमम येथे सापळा लावून सोन्या उर्फ संतोष पांडुरंग वंगाळ (वय 29) रा. रोटेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद यास पकडले. त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व 400 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 459/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget