श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्कल कामावर किरकोळ खर्चातून 10 लाखांचे काम करून त्याच कामासाठी पुन्हा 17 लाखांचे टेंडर मागवून 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. अशा कामात बेजबाबदार असणार्या अधिकार्यांविरुध्द कारवाई करण्याबाबत मुख्याधिकार्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक संजय छल्लारे व मिराताई रोटे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल पालिकेत मुख्याधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी गणेश शिंदे यांनी चौकशी समिती नेमून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या काळात अटलबिहारी वाजपेयी सर्कल करण्यासाठी 17 लाख 06 हजार 146 रुपये खर्चाचे टेंडर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने काढण्यात आले. त्या कामास संजय छल्लारे व मिराताई रोटे यांनी हरकत घेतली, कारण श्रीरामपूर परिषदेमधील भुखंडावर 23 जून 2020 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये किरकोळ काम सुचविले व ते सभेत मंजुर करून घेतले. दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी काम करण्याचे सांगून सदरचे काम तात्काळ चालु करावे, असा आदेश दिला. तद्नंतर तेथेच अटलबिहारी वाजपेयी सर्कल या नावाने त्याच कामाचे परत ऑनलाईन टेंडर मागिवले. सदर ठेकेदाराकडून जवळपास 10 लाख रुपयांची किरकोळ कामे करून घेतली. ती कामे पूर्ण झाली. अभियंता यांच्या सुचनेनुसार मे. व्यंकटेश कन्सट्रक्शन्स, श्रीरामपूर, के. जी. पाटुले, सावेडी, मे. प्रशांत गोलार, कुकाणा या तीन एजन्सीला दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या स्वखर्चाने दाखले दिले. पण त्याआधी त्या जागेवर सदरचे कामे झालेली होती. सदर कामे जवळपास 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाले होते, पण 6 महिन्यानंतर त्याच कामाचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने टेंडर काढून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असा आरोप श्री. छल्लारे व मिराताई रोटे यांनी केला.तेथील नगरपालिकेच्या प्रापर्टी, वस्तूची चोरी होत आहे हे निर्दशनास आणून देत त्या लोकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करुन कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. सदरील कामाची निविदा रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकार्याचा खुलासा मागवण्यात आला असुन खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमून 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. अटलबिहारी वाजपेयी यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्याकामी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय सादर करण्यात येईल व सभेच्या आदेशानुसार व निर्णयानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू नये, असे लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याने माजी नगरसेवक संजय छल्लारे व माजी नगरसेविका मिरा रितेश रोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण स्थगित करून 15 दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे स्पष्ट केले होते.लेखी आश्वासनानंतर 25 दिवसांत आजपर्यंत त्या अधिकार्यावर काहीच कारवाई झालेली नाही तसेच समितीही नेमली नाही. तसेच समिती नेमून त्यावर कारवाई झाली नाही म्हणून मुख्याधिकार्यांच्या दालनात बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले.अखेर या अधिकार्यांच्या चौकशीसाठी दोन अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा चौकशी अहवाल येताच कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपजिल्हाधिकारी गणेश शिंदे यांनी दिले. या चौकशीसाठी नेवासा येथील नगरपंचायतचे स्थापत्य अभियंता प्रवीण कदम व नेवासा नगरपंचायत लेखापाल भाऊसाहेब म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली. धनंजय कविटकर उपमुख्य अधिकारी यांनी लेखी आश्वासनाचे पत्र संजय छल्लारे व सर्व सहकार्यांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या ठिय्या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे महासचिव हेमंत ओगले, राजु आदिक, रितेश रोटे, संजय साळवे, राहुल मुथ्था, राजु भांबारे, बोरावके, राजु सोनवणे, भगवान उपाध्ये, अण्णासाहेब डावखर, सुभाष तोरणे, मुन्ना पठाण, श्रीनिवास बिहाणी, पप्पू कुर्हे, अशोक उपाध्ये, प्रवीण नवले, नितिन पिपाडा, पुंडलिक खरे, निलेश भालेराव, सुनिल जगताप, शरद गवारे, सुरेश ठुबे, राजु डुक्करे, के. सी. शेळके, फिरोज शेख, देवेन पिडीयार आदी सहभागी झाले होते.

Post a Comment