अहमदनगर : जिल्ह्यातील राहुरी तालुका, ५ वर्षीय निरागस बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हदरला आहे. राहुरी तालुक्यातील आरडगांव परिसरात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून. घरात खेळत असलेल्या ५ वर्षीय बालिकेस, संधीचा फायदा घेऊन. याचा परिसरत राहत असलेल्या. २५ वर्षीय किशोर ऊर्फ केश्या विजय पवार या नराधमाने, १८ जूनच्या दुपारी साडेबारा वाजे सुमारास, खुर्द यांचे शेताचे बांधा जवळ असलेल्या. नारळाच्या झाडाच्या येथे ५ वर्षीय निरागस बालिकेला विवस्त्र करून, अमानुषपणे अत्याचार केला. एवढेच नाही तर नाराधमाने केलेले काळ कृत्याचे बिंग फुटू नये याकरिता. आरोपीने कापडाच्या सहाय्याने, पीडित बालिकेचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या, मुलीच्या आईने सदर घटना पाहिली. आणि त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडा ओरड केली. हा आरडाओरड ऐकून पिडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून, त्या नराधमाने पिडित बालिकेच्या आईला धकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर होतं म्हणून,५ वर्षीय पीडीत बालीकेचा जिव वाचला. नाहीतर मोठा अनर्थ देखील घडला असता. सदरच्या घटनेनंतर पीडित बालीकेला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलीस फौज फाट्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करून. अत्याचार करणाऱ्या नाराधमास गजाआड केले. माणुसकीला काळिमा फासणा-या घटने संदर्भात, पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून,आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार अपहरण व अत्याचार प्रकरणी. राहुरी पोलिस ठाण्यात भदवी कलम ३०७,३७६ अ,३७६ अ, ब, ३६३, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८, ५ आय,एम, एन, पी, आर, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.

Post a Comment