बेलापुर (प्रतिनिधी )- एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार तरी केव्हा व नागरीकांची, प्रवाशांची होणारी लुट थांबणार कधी ? असा सवाल सर्व सामान्य नागरीकाकडून विचारला जात आहे आपल्या मागण्या बाबत एस टी महामंडळाचे कर्मचारी ठाम आहे .शासन दखल घेत नाही कर्मचारी तुटेपर्यत ताणत आहेत त्याचा परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होत आहे .एस टी कर्मचाऱ्यांंचा संप सुरु होवुन तीन महीन्याचा कालावधी उलटून गेला आहे.त्यांच्या मागण्यावर विचार करण्यास शासनास वेळ नाही काही बाबी न्यायालयाच्या कक्षेत गेलेल्या आहेत, तीन महीन्याच्या कालावधीत एस टी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे .त्यात महामंडळाचा तोटा तर झालाच शिवाय प्रवाशांना प्रवासासाठी दाम दुप्पट दर मोजावे लागले तसेच मागेल तितके पैसे देवुनही अनेक प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच गेल्या तीन महीन्यापासून हजारो बसेस डेपोत उभ्या आहेत त्यांचाही मेंन्टेनन्स खर्च वाढणार आहे खाजगी वहातुकदारांना सोन्याचे दिवस आले आहेत प्रवाशांकडून मन मानेल तसे भाडे आकारले जात आहे .हे सर्व थांबणार कधी? लाल परी रस्त्यावर धावणार कधी ? असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या सर्वापेक्षाही कर्मचाऱ्यांचीही अतिशय वाईट अवस्था आहे कुटुंबाचा दररोजचा खर्च कसा भागवायचा याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे त्यातच संघटनांचे नेते गायब झालेले आहेत कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतलेले आहे .असे असले तरी हे आंदोलन कुठेतरी थांबले पाहीजे एस टी महामंडळ स्थापने पासुन सर्वात मोठा फटका महामंडळाला सध्या बसलेला आहे कोरोनामुळे ठप्प झालेले जनजिवन हळूहळू सुरळीत होत आहे आता लालपरी देखील रस्त्यावर धावणे गरजेचे आहे .नाहीतर अनेक कुटुंबाची वाताहत होणार हे मात्र नक्कीच.
Post a Comment