कर्जत प्रतिनिधी-स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 10 लाखांना गंडा घालणार्या सचिन आल्या पवार (वय 26 रा. राक्षसवाडी ता. कर्जत) यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपींच्या टोळीने बांधकाम व्यावसायिक संतोष रामचंद्र घुडे (वय 43 रा. आंबिवली ता. कर्जत जि. रायगड) व त्यांचा मित्र यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. टोळीतील एक साथीदार विठ्ठल जाधव (खरे नाव माहीत नाही) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोने घेण्याची तयारी दर्शविताच त्यांना 9 फेब्रुवारी 2022 रोजी नगर-सोलापूर रोडवर कोंभळी फाट्याजवळील शेतात पैसे घेऊन बोलाविले. तेथे 10 ते 12 जाणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. 10 लाख रुपये व तीन मोबाईल घेऊन आरोपी पळून गेले.घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी पवार याला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अमंलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, महादेव कोहक, गोवर्धन कदम यांनी अटक केली आहे.
Post a Comment