श्रीरामपूर प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी श्रीरामपुरातील आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या शेतकर्यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल घेऊन पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे हे त्यांच्या एमएच 17-बीसी 6022 हे मोटारसायकलवरुन ते त्यांच्या दौडेवाडी या गावी चालले होते. श्रीरामपूर एमआयडीसी जवळील यशवंत बाबा चौकी याठिकाणी पाठिमागून पल्सर या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या मोटारसायकलला आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तुमच्याकडील रोख रक्कम काढा असे म्हणताच यांनी त्यांच्या खिशातून 250 रुपये रोख काढून दिले. तसेच त्यांच्याकडे असलेला मोबाईल व मोटारसायकल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या पोलीस पथकाने भेट देऊन पहाणी करत चौकशी केली.
Post a Comment