बेलापूरात राबविले पोषण आहार जनजागृती अभियान


बेलापूर : - ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत देशभर महिला बाल विकास विभाग , आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पोषण माह साजरा करण्यात येत आहे. या अभियानास 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावामध्ये पोषण आहार जनजागृती केली जाणार आहे.

       या मोहिमेअंतर्गत बेलापूर येथील अंगणवाडीसेविका उज्वला ढवळे यांनी त्यांच्या विभागातील मनिषा किशोर कदम या गरोदर मातेस मार्गदर्शन केले. यावेळी गरोदर मातेचा आहार घरचा ताजा सकस व पोषक असावा ,  मोसमी ताजी फळे , दूध , तूप , दही , पालेभाज्या , मोड आलेली कडधान्ये आदी पदार्थ  आहारात असावे. वेळेवर लसिकरण करून गोळ्याऔषधी वेळच्यावेळी घ्यावीत त्याचप्रमाणे गरोदर मातेची काळजी कशी घ्यावी आदी मार्गदर्शन केले. 

          हे अभियान गावातील प्रत्येक अंगणवाडीत अंगणवाडीसेविका , आशा वर्कर , आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी , कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते आदिंच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे. यावेळी अंगणवाडीसेविका उज्वला ढवळे यांचेसह आरोग्य कर्मचारी ए.एन.एम.वंदना खरात , आशा वर्कर मीरा अमोलिक ,  मदतनीस श्रीमती शेलार आदी कर्मचारी उपस्थित होत्या.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget