शिर्डी (प्रतिनिधी) जय शर्मा / प्रशांत अग्रवाल. शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथे श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवून श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये राज्यातून रुग्ण येत असतात ,येथे श्री साईबाबा नंतर डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप समजले जाते, मात्र अशा काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणनही असू शकतो हे नुसतेच सिद्ध झाले असून शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील डॉक्टर वैभव बबन तांबे ह्या डॉक्टराने एका अल्पवयीन मुलीवर तपासणीच्या नावाखाली विनयभंग केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे, या संदर्भात शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे, या प्रकारामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी रुग्णसेवा केली, तसेच उदी प्रसाद देऊन अनेकांचे रोग बरे केले, तोच वारसा घेऊन शिर्डीत श्री साईसंस्थानने रुग्णालय थाटले आहेत, या रुग्णालयात साईबाबांवर श्रद्धा ठेवून शिर्डी व परिसराप्रमाणे जिल्ह्यातील व राज्यातील परराज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात ,कारण हे श्री साईबाबांचे हॉस्पिटल आहे ,अशी सर्वांची श्रद्धा भावना आहे,येथिल हॉस्पिटलमधील डॉक्टरही ही एक देवाचे अवतार समजले जातात, मात्र एका डॉक्टरने त्यास काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे, डॉक्टर वैभव बबन तांबे या डॉक्टराने येथे एक तरुणी उपचारासाठी आली असता तिला तपासणीच्या नावाखाली तिचा विनयभंग दिनांक 19/ 9 /2020 रोजी स, 3. 30 ते सांय 7.30 दरम्यान केला आहे व तशी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि,नं,1 627/2020 प्रमाणे भा,द,वि,
कलम 354 अ,ब,आणि बालकांचे लैंगिक शोषणाचे कलम 8/ 10 प्रमाणे गुन्हाही दाखल झाला आहे , घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे तसेच सपोनि मिथुन घुगे व सपोनि दातरे यांनीही भेट दिली आहे, या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत, दरम्यान या घटनेची चर्चा शिर्डी व परिसरात होताच मोठी खळबळ उडाली आहे, शिर्डी व परिसरातून या घटनेचा मोठ्या स्वरुपात निषेध करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे याच हॉस्पिटलमध्ये इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी या घटनेचा निषेध केला आहे, शिर्डीतील हॉस्पिटल हे श्री साईबाबांचे हॉस्पिटल समजले जात असताना येथे मात्र अनागोंदी कारभार सुरू असलेला यावरुन दिसून येत आहे, कोरोणाच्या काळात राज्यातच नव्हे तर देशात ,जगात सर्व डॉक्टरांना देव दूत म्हटले जाते आहे,मात्र येथील एक डॉक्टर असे कृत्य करू शकतो, याचा कोणाला विश्वास बसणार नाही, मात्र असे आज रविवारी घडले आहे, शिर्डी संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये असे काही डॉक्टर आहेत की त्यांची पदवी नसतानाही येथे या हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर ते वशिल्याने जाऊन बसले आहेत , व त्यांच्या हाताखाली काम करणारे डॉक्टरही त्यांनाही हे माहीत असल्यामुळे तेही असे प्रकार करत आहेत, येथे कोणालाही कोणाचा धाक राहिलेला नाही, या संदर्भात नागरिक तीव्र निषेध करत असून ही विनयभंगाची घटना येथे मोठी दुर्दैवाची झाली आहे ,त्यामुळे एका डॉक्टरांनी केलेली ही चूक संपूर्ण हॉस्पिटल व श्री साईबाबा संस्थान कडेही बोट दाखवण्यासारखे होत आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने, व्यवस्थापनाने त्वरित या घटनेकडे लक्ष द्यावे व यापुढे असे प्रकार श्री साईबाबाच्या, संस्थांनच्या हॉस्पिटलमध्ये तरी घडू नये किंवा संस्थांनच्या कोणत्याही विभागात असा प्रकार होऊ नये, यासाठी अधिक काळजी व दक्षता यापुढे घेणे महत्त्वाचे ठरणार आहे, श्री साईबाबांची महती देश-विदेशात आहे ,शिर्डी चे नाव सर्व जगात, विश्वात पसरलेले आहे, त्यामुळे अशी घटना घडली गेली तर तिची चर्चा देशात, विदेशात होत असते,त्यामुळे बदनामी होत असते, यापुढे अशा घटना होऊ नये, म्हणून साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने अतिदक्षता घेऊन प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे शिर्डीकर व साईभक्त बोलत आहेत.
Post a Comment