कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
काही दिवसांपासून कोल्हार भगवतीपुर परिसरातील रान शेंडा येथे धुमाकूळ घालीत असलेला बिबट्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास अखेर पिंजऱ्यात अडकला याबाबत सविस्तर असे की रानशेंडा येथील रामराव चांगदेव खर्डे पाटील व उल्हास खर्डे पाटील यांच्या वस्तीवर व परिसरात गेले दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य होते या बिबट्याने या परिसरातील कुत्रे व बकऱ्यांवर हल्ला चढवित फस्त करीत त्यामुळे या परिसरातील रहिवासी चांगलेच भयभीत झाले होते शेतात काम करणाऱ्या मजुरांना दहशतीमुळे शेतीत काम करणे अवघड झाले होते परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावला पण बिबट्या या पिंजऱ्यात अडकत नसल्याने दोन ते तीन ठिकाणी जागा बदलून हा पिंजरा लावण्यात आला शेवटी उल्हास खर्डे व प्रशांत खर्डे यांच्या शेताजवळील रोडलगत पिंजरा ठेवण्यात आला या पिंजऱ्यात अखेर मंगळवारी पहाटे च्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला.
जेरबंद झालेला बिबट्या एक ते दीड वर्षाचा असून अजूनही एक -दोन बिबट्याचा संचार परिसरात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे व पुन्हा या भागात पिंजरा लावण्याची मागणी.
Post a Comment