कोल्हार :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ,स्कूलच्या प्रांगणात श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार रवी भागवत व भरतकुमार उदावंत यांनी सादर केलेल्या व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला कुंचल्याच्या अवघ्या काही फटकार्यातून या जोडीने देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यंगचित्रे साकारली न्यू इंग्लिश स्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते
प्रारंभी विविध क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य शशिकांत सोनवणे ,उपप्राचार्य चौधरी ,पर्यवेक्षक, गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख गुंजाळ, गुरुकुल चे समन्वयक निंबाळकर ,सचिन खंडागळे, दीपक मगर ,कलाशिक्षक ए.जी नवले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुंभकर्ण आदी उपस्थित होते
यावेळी श्रुती खंडागळे, श्रेया खंडागळे गौरी गाढे शाजिया शेख या विद्यार्थ्यांचे सत्कार झाले इयत्ता नववी मध्ये हस्त चित्रांच्या पाठांचे महत्व भागवत यांनी विशद केले
उदरनिर्वाहासाठी विविध उद्योग करण्याबरोबर आपण पु ल देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कलेशी मैत्री आवश्यक जोडावी व जीवनातील खरा आनंद मिळावा असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले उदावंत यांनी आपल्या खास शैलीत वात्रटिका सादर करून विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचा संदेश दिला लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण झाल्यास तरुणपणी मुलांची पावले भरकटली जात नाहीत व्यायाम व सोबत कलेची जोड यामुळे तरुण पिढी व्यसनापासून दूर ठेवली जाऊ शकते
अशी आशा त्यांनी व्यक्त केली पाहुण्यांचा परिचय पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन खंडागळे यांनी केले तर आभार दीपक मगर यांनी मानले.
Post a Comment