बुलडाणा- 18 डिसेंबर
"कुंपणच शेत खाते" या म्हण प्रमाणे बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीत मुल्यांकन अधिकारी या पदावर कार्यरत दीपक वर्मा व अन्य सहा जणांनी संगनमत करुण या पतसंस्थेत बनावट सोन्याचे दागीने तारण ठेवून 80 लाखांनी संस्थेची फसवणूक केल्याची तक्रार बुलडाणा अर्बनचे शाखा प्रबंधक वानेरे यांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मूल्यांकन अधिकारी दीपक वर्मा, संजय शंकर मठारकर, आनंद देशमुख, प्रसाद राऊत, प्रवीण वाघ, विकास पेठकर या सहा आरोपींविरुध्द भादवीचे कलम 420,471,468,34 अन्वय गुन्हा दाखल करत अटक केली आहे.आरोपींना आज कोर्टात हजर केले असता पुढील 21 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडित रवानगी करण्यात आली आहे.नकली सोने तारण ठेवून अशीच फसवणुक अजुन कुठे कुठे करण्यात आली आहे का?या प्रश्नाचे उत्तर पोलिस तपासा नंतरच समोर येणार.या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.
- येथील जिजामाता महिला सहकारी बैंक मध्ये 27 लाखांचे नकली सोन्याचे दागीने तारण ठेवून बैंकेची फसवणूक केल्याची घटना ताजी असतांना आता नामांकित बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ला ही अशाच प्रकारे 80 लाखांचे नकली सोने तारण ठेवून गंडविल्याची बाब समोर आल्यानंतर या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करून 6 आरोपी अटक असून कोर्टाने 21 डिसेंबर पर्यंत पीसीआर मध्ये रवानगी केली आहे.

Post a Comment