बेलापूर (प्रतिनिधी )-- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्याय आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात असुन या उपक्रमामुळे सर्वसामान्याचा वेळ व पैशाची बचत होवुन आपापसात सलोख्याचे संबध निर्माण होतील असा विश्वास श्रीरामपूर न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस के टोणपे यांनी व्यक्त केले
बेलापूर येथे फिरते लोक अदालत कार्यक्रमात त्या बोलत होत्या या वेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऐ जी शेख अँड पी एम करंदीकर अँड व्ही एम मगर जी ऐ खेडकर मँडम अँड व्ही आर घोडे आर सी दायमा आदी मान्यवर उपस्थित होते न्यायमूर्ती टोणपे पुढे म्हणाल्या की लोक अदालत मुळे दोन्ही पक्षकारांना समाधान लाभेल न्यायलयात केवळ एकाच बाजुने नीकाल होतो परंतु या अदालत मध्ये दोन्ही पक्षकाराचे समाधान होते बेलापूरचे नागरीक जागृक असल्यामुळे या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल असेही त्या म्हणाल्या या वेळी अँ सुभाष बिहाणी अँड जगन्नाथ राठी अँड विजय साळुंके तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे उपसरपंच रविंद्र खटोड सिताराम गायकवाड चन्द्रंकात नाईक विलास मेहेत्रे मधुकर अनाप रफीक शेख सरपंच राधाताई बोंबले नामदेव बोंबले जाकीर शेख पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमापोलीस काँ ,निखील तमनर जाकीर शेख विजय शेलार आदिसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत साळुंके यांनी केले तर अँड जगन्नाथ राठी यांनी आभार मानले या न्यायालयात २०केसेस सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या
Post a Comment