बेलापूर (प्रतिनिधी )- विहीरीत पाय घसरुन पडलेल्या ओम् नंदिरे यास वाचविणार्या विकास कांबळे या धाडसी मुलाचा बेलापूर पोलीस स्टेशन बेलापूर पत्रकार संघ बेलापूर ग्रामस्थ अकबर भाई टिन मेकरवाले यांच्या वतीने सत्कार करुन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे हे होते या वेळी जि प सदस्य शरद नवले मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता सावंत उपसरपंच रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळुंके प्रा अशोक बडधे अशोक कारखान्याचे संचालक आभिषेक खंडागळे शशीकांत थोरात अकबर टिन मेकरवाले जे टी एस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री उंडे अनभुले दिपक क्षत्रिय चंद्रकांत नाईक भास्करराव खंडागळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे मनोज श्रीगोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ भाऊसाहेब तेलोरे राऊत साहेब पत्रकार दिलीप दायमा आदि उपस्थीत होते प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले
Post a Comment