शाह अंजुमन मुस्लिम जमाअत खानाचे भुमीपुजन संपन्न.


श्रीरामपुर शहरातील वार्ड नंबर 1 मिल्लात नगर याठिकाणी शाह अंजुमान मुस्लिम जमाअत खाना (शादी हॉल )मंगल कार्याचे नुकत्याच पायाभरणीचा कार्यक्रम झाला श्रीरामपुर शहरातील शाह अंजुमन मुस्लिम जमाअत खाना शादी हॉल मंगल कार्यालयाचे भूमिपूजन महाराष्ट्र शाह अंजुमान मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री हाजी रहमान शाह हाजी मासूम शाह मालेगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील शाह प्रमुख श्री रमजान हैदर शाह होते तसेच माहिती देताना प्रवक्ता श्री याकूब हाजी रुबाब शाह यांनी सांगितले की श्रीरामपूर शाह समाजाचे स्वप्न 1994 पासून स्वतःच्या जमाअत खाना व्हावा म्हणून समाज बांधवांकडून सन 2004 पासून वर्गणी गोळा करण्याचे काम हाती घेतले होते व समाज बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सन 2015 मध्ये मिल्लत नगर या ठिकाणी पाच गुंठे जागा या समाजाचे नावाने रक्कम रुपये चाळीस लाखाला खरेदी केले आता या जागेवर रुपये 80 लाखांची एक सुंदर भव्य इमारत लवकरात लवकर समाज बांधवांकडून पैसे गोळा करून बांधण्याचा संकल्प केला आहे
अध्यक्ष श्री याकूब भाई शाह यांनी रक्कम 75000, महाराष्ट्र अध्यक्ष रहमान शाह यांनी रक्कम 1 लाख अकरा हजार ,रौफ भाई शाह यांनी रक्कम रुपये 50000 ,इम्तियाज बबलू शाह यांनी रुपये 50000, आरिफ बुद्धा शाह यांनी रुपये 50000, तर मालेगाव चे नगरसेवक अनिस भाई शाह यांनी रुपये रक्कम 25000 माजी शिक्षण संचालक श्री रामचंद्र जाधव सर यांनी रुपये रक्कम 11000 व स्थानिक शाह समाजाचे वरचे नागरिकांनी जमाअत खाना व्हावा म्हणून देणगी देण्याचे कबूल केले आहे ही जागा सर्व शुभकार्यासाठी सर्व धर्मियांसाठी देण्यात येणार आह
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष हमीद नवाज शाह नगरसेवक हाजी मुक्तार शाह गफार दाऊद शाह हे होते तर कुराण खानी (आशीर्वाद )जामा मशिदीचे चे मौलाना हजरत हाजी इमदाद साहब शहर काजी अकबर अली शाह समाजाचे पदाधिकारी उपाध्‍यक्ष आमीन यासिन शाह सचिव जमील इब्राहिम शाह सहसचिव हाजी सलीम मेहबूब शाह खजिनदार फिरोज वजीर शाह सहखजिनदार हाजी जलील हाजी खलील शाह कार्याध्यक्ष राऊफ उस्मान शाह युनुस हारून शाह तसेच सल्लागार सर्वस्वी चांद इमाम शाह गफूर सांडू शाह जावेद (भोला भाई )शाह अन्वर हाजी रशीद शाह फिरोज हाजी रसूल शाह नसरुद्दीन अब्बास शाह तसेच शहरातील मान्यवर श्री अविनाश दादा, उपनगराध्यक्ष करण दादा सासाने श्री सचिन भाऊ गुजर नगरसेवक हाजी अंजुम भाई, कलीम भाई कुरेशी ,शाह छप्परबंद स.स.अध्यक्ष आरमान बुगा शाह शाह खासदार समाजाचे अध्यक्ष गफार कासम शाह शाह छप्परबंद उर्दू हायस्कूल चे चेअरमन फारुख कासम शाळा आणि महाराष्ट्रातील शहा जमातीचे सन्माननीय तसेच सुरत शहरातील शाह समाजाचे बांधव देखील या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी होणे कामी शहरातील ए बी ग्रुप, बाबर पुरा ग्रुप ,अल बदर ग्रुप ,आणि शहा समाजाच्या युवक कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार हाजी उमराली शाह यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाह समाजाचे अध्यक्ष श्री याकूब हाजी रुबाब शाह यांनी केले

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget