आधारच्या डाटाबेसशी छेडछाड; दिंडोरीत आधार केंद्र सील, ऑपरेटरवर गुन्हा

आधार केंद्रात स्वत:च्या फिंगर प्रिंटऐवजी रबरी ठसे वापरून आधार केंद्राच्या डाटाबेसमध्ये माहिती अपलोड करणे चांगलेच महागात पडले आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात आधार केंद्राच्या ऑपरेटरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आधार केंद्रात होत असलेल्या अफरातफरीमुळे सर्वाधिक सुरक्षेचे मानले जाणारे फिंगरप्रिंटमधून अपहार होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, हे प्रकार टाळण्यासाठी आपण कुठे फिंगर प्रिंट देत आहोत? याबाबत काळजी घेणे घेणे गरजेचे आहे.अधिक माहिती अशी की, आधार केंद्रात ऑपरेटर आणि सुपरवायझर यांचे थंब (फिंगरप्रिंट) वापरून आधारच्या मुख्य केंद्राशी माहितीची देवाणघेवाण केली जाते. ही माहिती देताना थंब थोड्याफार प्रमाणात वेगवेगळा नोंद होतो, मात्र दिंडोरीतील एका आधार केंद्रात चक्क ऑपरेटरने बनावट फिंगरप्रिंटचा रबरी शिक्का तयार करून डाटाबेसलाच आवाहन दिले.या घटनेत एकाच प्रकारचा थंब सर्व्हरला प्राप्त होत असल्याची माहिती मुंबईतील आधारच्या मुख्य केंद्रास मिळाली. येथील अधिकाऱ्यांना संशय आला, त्यांनी ताबडतोब नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबत माहिती दिली.जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना याबाबत तपासणी करण्याबाबत सांगितले. गाढवे यांनी संबंधित आधार केंद्रात जाऊन तपासणी केली असता तिथे बनावट फिंगरप्रिंट आढळून आले.हा सर्व प्रकार गंभीर असून आगामी काळातील ही धोक्याची घंटा असल्यामुळे ताबडतोब आधार केंद्र ऑपरेटरवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.कैलास धोंडीराम गायकवाड रा. मडकीजांब ता. दिंडोरी असे या ऑपरेटरचे नाव आहे. दिंडोरीतील आधार केंद्रातून केंद्रातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.अशी घ्या काळजी फिंगरप्रिंट बनावट तयार करण्याचा पहिलाच प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारचे गुन्हे होण्याची शक्यता बळावली असेल तर फिंगर प्रिंट आपण कुठे देत आहोत. कशासाठी दिला जात आहे. याबाबत माहिती घ्यावी. हॉटेलमध्ये जर कुणी एखाद्याला मद्य प्राशन करून फिंगरप्रिंट घेतले तर अपहार होऊ शकतो अशा शक्यता टाळण्यासाठी हातमोजे वापरावेत.आधार कार्डचे असे चालते काम आधार केंद्रात ऑपरेटर आणि सुपरवायझर यांचे थंब (फिंगरप्रिंट) वापरून आधारच्या मुख्य केंद्राशी म्हणजेच डाटाबेसशी संपर्क करून आपल्याला आधारची माहिती देता येते. हे काम करत असताना, माहितीची देवाणघेवाण करत असताना थंब काहीवेळा चुकतो, काहीवेळा त्याच्या लेयर्स चुकतात. मात्र, आधारचा डाटाबेस या सर्व गोष्टी अभ्यासून सर्व्हर माहिती संकलित करते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget