चार महिला आरोपींविरुध्द गुन्हा दाखल श्रीरामपुरातील गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे छापे
श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर व परिसरात नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातभट्टीची गावठी दारु बनविण्याच्या चार ठिकाणी छापे टाकून त्या ठिकाणाहून पोलिसांनी 4 आरोपीविरुध्द कारवाई करत सुमारे 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदिप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे आकाश काळे, शिवाजी ढाकणे, महिला पोलीस
कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबादास पालवे या पथकाने काल सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. 7 मधील दोन ठिकाणी त्यानंतर भैरवनाथनगर येथे दोन ठिकाणी अशा चार गावठी हातभट्टी दारु बनविण्याच्या ठिकाणी छापे टाकून हे दारु अड्डे उद्ध्वस्त करुन गावठी हातभट्टी दारु व त्याचे कच्चे रसायन नष्ट केले. या छाप्यात पोलिसांनी 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. यात चार महिला आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 989/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो. ऍ़. क. 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रु.किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 10 हजार /- रु.किमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली.दुसर्या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 990/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ)अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रुपये किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5 हजार रुपये किची 50 लि. तयार दारु नष्ट केली.तिसर्या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 991/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो .ऍ़. क. 65 (ई) (फ) एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करत या ठिकाणाहून 40, हजार रुपये किंमतीचे 800 लि. कच्चे रसायन 10 हजार रुपये किंमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली आहे.चौथ्या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 992/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ)अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी 25 हजार रुपये किंमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु नष्ट केली आहे. या प्रकरणात एकुण 4 महिला आरोपीकडून 1,45,000/- रु. कि.ची 2300 कच्चे रसायन 300 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु नष्ट करण्यात आली आहे.