Latest Post

औरंगाबाद : पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चक्क सहायक फौजदारच जुगार खेळताना आढळून आल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बऱ्याच दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरु होता. मात्र स्थानिक पोलिसांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे आरोप नेहमीच होत होते. त्यामुळे अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी रविवारी रात्री अचानक छापा टाकला. या छाप्यात वीरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले.औरंगाबाद ग्रामीण विशेष पथकाला वीरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शाहरूख टी स्टॉलमध्ये काही जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता वीरगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकणी पाचही जुगाऱ्यांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगार अड्डा सुरु होता का ? त्यामुळे ठाणेप्रमुखावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक ( प्रतिनिधी )लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेले सातपूरचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर तालुक्याच्या दोघा निरीक्षकांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिसन नागदरे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांच्या कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारताना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना शुक्रवारी सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारातील शासकीय निवासस्थान येथे सापळा रचून पकडले होते.न्यायालयाने त्यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. एसीबीने लागलीच जाधव यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.तालुका पोलीस ठाण्याचे नागदरे आणि देवरे यांना गुरुवारी लाचेची रक्कम घेताना तालुका पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी एका इव्हेंट मॅनेजमेंटचे काम पाहणार्‍या व्यक्तीने तक्रार दिली आहे. कार्यक्रमा दरम्यान साऊंड सिस्टिमचा वापर करण्याची मंजुरी देण्यासाठी नागदरे आणि जाधव यांनी पैशांची मागणी केली होती. त्यातील 25 हजारांची रक्कम घेताना दोघांना एसीबीने पकडले. यानंतर कोर्टाने दोघांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एसीबीने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दोघांच्या कोठडीत एका दिवसाची वाढ केली.पोलीस ठाण्यांना निरीक्षकांची प्रतीक्षा सातपूर तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना लाच प्रकरणी अटक केल्यानंतर दोन्ही पोलीस ठाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा पदभार सध्या सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील रजेवर असून ते हजर झाल्यानंतर सातपूरचा निर्णय होणार आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसात होईल, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलाच्या सूत्रांनी दिली. 

यवतमाळ-दिग्रस तालुक्यातील इसापूर जि.प.शाळेचा भोंगळ कारभार झाल्याचे शाळेच्या मुख्य भागाचा दरवाजा रात्रीला सुद्धा उघडा राहत असल्याने मोठी चिंतेची बाब बनली आहे.या कडे नवीन रुजू झालेल्या मुख्याध्यापिका खडतकर यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते.

         जि.प.इसापूर शाळेत अनेकदा चोरी झाल्या आहे.तसेच एक वेळा तर रेकॉर्डरूम ला अज्ञात आरोपीने आग लावली त्या आगीत पूर्ण रेकॉर्ड खाक झाला होता या सर्व घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रारी सुद्धा झालेल्या आहे.जि. प.इसापूर शाळेत मुख्याध्यापिका यांचे सध्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने एखादी घटना घडण्याची शक्यता बळावू शकते कारण रात्रीच्या वेळी शाळेचे मुख्यद्वार बंद अवस्थेत दिसत नसल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता असू शकते. हा मुख्य दरवाजा नेहमी उघडा राहत असल्याने प्रेम युगल या शाळेचा उपयोग घेऊ शकतो कारण या शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी अनेक मोबाईल वर बोलणारे या आवाराचा उपयोग घेत आहे.तेव्हा पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळा सुटल्यावर मुख्य दरवाजा बंद करावा जेणेकरून रात्रीच्या वेळी कोणीही शाळेत प्रवेश करणार नाही यासाठी योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी इसापूर वासीयांनी केली आहे.

           

      

पाथर्डी_तालुका प्रतिनिधी  विकास दिनकर*
पाथर्डी_तालुक्यातील तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या  चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी गाडी  व बॅटरी ताब्यात घेतल्या.अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या कंट्रोल रूममधून सेंटर लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 48 हजार रुपयाचे किमतीच्या 24 बॅटरी चोरून नेल्या याबाबत माहिती गारा कडून माहिती मिळताच व पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने पाथर्डी च्या दिशेने पिकप गाडी क्रमांक एम एच 17 ए जी 47 73 मधून मुद्देमाल नेत्यांना आढळणारा गाडी थांबून पोलिसांनी तपास सुरू केली असता अंधाराचा फायदा घेऊन तिघेतिघे चोरटे पळाले .पोलीस नाईक सचिन नवगिरे राहुल तिकोने व संदीप नागरगोजे यांच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती गोविंद मचाले निसा सिक्युरीटी सुपरवायझर (अहमदनगर) यांनी दिली tu

मुंबई | वृत्तसंस्था हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर एनकाऊंटरची चौकशी तेलंगणा सरकारने सुरु केली आहे. यासाठी आठ सदस्यीय अधिकाऱ्यांची टीम हि चौकशी करणार आहे. याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून मानव हक्क आयोगदेखील याबाबत चौकशी करणार आहे.या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य तेलंगणा सरकारने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्यासह एक टीम ही चौकशी पूर्ण करणार आहे.भागवत तेलंगणा येथील रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. हैद्राबादमधील संपूर्ण घटनेची चौकशी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे काम या संपूर्ण टीमकडे असणार आहे.याप्रकरणी तेलंगणा येथील न्यायालयाने एनकाऊंटर झालेल्या चारही मुलांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश  होते. दरम्यान,   न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.

नाशिक( प्रतिनिधी)जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्लबसह अत्यंत महत्वपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षात सुरू न होऊ शकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य असेल अशी माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना दिली.कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदाच दोनदिवसीय नाशिक दौऱयावर आहेत. त्यानिमित्ताने आज नाशिक येथील कार्यालयात जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.यावेळी भुजबळ भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असल्याने महिन्यापेक्षा जास्त काळ नाशिक आणि येवल्याला येऊ शकलो नाही. मुंबईत होत असलेल्या घडामोडींमुळे मुंबईत थांबणे अत्यंत आवश्यक होते. त्यानंतर  दि. २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयीन कामकाज देखील सुरू झाले आहे. त्यामुळे नाशिकला येण्यासाठी उशीर झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सन १९९१ साली पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर २५ वर्षात मंत्रीपदावर काम।केले. मात्र गेल्या पाच वर्षांचा कालावधी भुजबळ कुटुंबीयांसाठी अत्यंत खडतर होता. अशा वेळी भुजबळ संपले अशा वार्ता पसरविल्या जात होत्या. मात्र मतदारसंघातील जनता आणि पवार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पुनर्जन्म झाला. आणि  मंत्रीपदावर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नाशिक जिल्हयातील बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले. मात्र गेल्या पाच वर्षात का सुरू होऊ शकले नाही हाही एक प्रश्नच आहे. मात्र आता हे सर्व रखडलेले प्रकल्प तसेच नव्याने काही प्रकल्प मार्गी लावले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी तसेच अधिक नवीन वाढण्यासाठी प्रयन्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.अत्याचारांच्या घटनेवर बोलतांना ते म्हणाले की, समाजात विकृत गुन्ह्यांची वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटना या अत्यंत वेदनादायी असून नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. या घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच यावर जो त्वरीत कारवाई करत नाही तो पोलीस अधिकारी जबाबदार धरला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.खातेवाटपाबाबत ते म्हणाले की, खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. येत्या काही दिवसात हा प्रश्न मिटेल. ते म्हणाले की, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. उलट त्यांना परत आणण्यासाठी मी स्वतः प्रयन्त केले आहे. त्यांना पद देण्याचा अधिकार हा पवार साहेबांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या,मग टीका करा असे सांगत रात्रीतून शपथ घेणं हा धोका असल्याची टीका त्यांना केली.जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, खडसे मला भेटले आहेत आणि कामानिमित्त नेहमीच भेटत असतात. भाजपात ओबीसी नेते नाराज या खडसेंच्या आरोपात तथ्य आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही असे सांगत खडसे अनुभवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

पाथर्डी(प्रतिनिधी विकास दिनकर)शेवगाव तालुका व परिसरामध्ये सुमारे पंधरा वर्षान पासून या ठिकाणी सर्पमित्र आतार बंधू हे सर्व प्रकारचे सर्प उदारणार्थ नाग,नागीण,धामण,आजगर,घोणस,मणियार,अशा सर्व प्रकारचे सर्प धरून जंगलामध्ये सोडण्याचे काम करतात.
      गेल्या दोन दिवसांमध्ये आतार बंधूनी विशेषतः गफार आतार व मुड्याभाई आतार या दोन बंधूनी गेल्या दोन दिवसामध्ये पाच नाग,एक नागीण,एक अतिशय विषारी घोणस,एक धमन,बिन विषारी दोन सर्प गेल्या दहा दिवसानामध्ये पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये विविध भागानामध्ये पकडून त्यांना निसर्गामध्ये मुक्त केले. विशेष म्हणजे सर्पाचे प्राण वाचवतात त्या सोबत नागरिकांचे प्राण वाचून निसर्ग संवर्धनासाठी निच्छित त्यांचा हातभार लागतो.या  मुळे पाथर्डी शेवगाव परिसरात कुठही सर्प अथवा नाग घ्यारांमध्ये,दुकानांमध्ये,मळ्यामध्ये,कंपनी मध्ये,आठवा सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये शाळा कॉलेज येथे आढळल्यास मुद्याभाई व गफार भाई याना संबधित ठिकाणाहून फोन येतो.व ते तत्काळपने व निस्वार्थीपणे जाउन त्या ठिकाणात संबधित निघालेला सर्प धरून ते सोडून देतात.
      या मुळे त्यांनी हजारो सर्पाचे जीव गेल्या पंधरा वर्षान मध्ये वाचविले आहेत. तसेच सुमारे पंधरा ते वीस सर्प मित्र तयार केले आहेत.आणखी ज्यांची इच्छा आहे सर्प वाचविण्याची,त्यानाही ट्रेनिग देण्याची त्यांची तयारी आहे.
मात्र एकाच त्यांचे म्हणणे आहे,स्वतःच्या जीवाची परवा न  करतात स्वतः चा जीव धोक्यात घालून इतर नागरिकाचे व सर्पाचे प्राण वाचवून निसर्गसंवर्धन करतात.यावेळी त्यांचे कुटुंब अतिशय काळजी मध्ये असते. मात्र सर्प विषयी निसर्गाविषयी प्रेम आणि ज्या कुटुंबांमध्ये सर्प निघाला त्यांचा विषयीचे प्रेम हे सर्व सामाजिक बांधिलकी म्हणून ते मोठ्या धाडसाने स्वतः चा जीव धोक्यात घालून हे सामाजीक कार्य करतात .
          मात्र शासनाचे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याने त्यांच्या मनामध्ये खंत आहे.त्यांच्या म्हणण्या नुसार फक्त पाथर्डी_शेवगाव नाही तर नगर जिल्हा व महाराष्ट्र मध्ये जेवडे खरे सर्प मित्र आहेत.त्या सर्व मित्रांना विविध प्रकारच्या सुविधा शासनाने द्याव्यात आशी आतार यांची मागणी आहे.विशेषतः यामध्ये सर्प धरताना काही अपघात झालयास आथवा सर्पदंश झाल्यास दवाखान्याचा खर्च सर्प मित्राचा मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांचा विमा त्यांच्या घरच्यांना भरपाई तसेच सर्प धरण्याचे अत्याधुनिक साहित्य त्याना वेळोवेळी सरकार कडून त्यांना मिळावे.त्यांना वेळोवेळी बदलत्या काळानुसार किमान वर्षातून एकदा जिल्ह्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावी.आशा काही मागण्या त्यांच्याकडे आहेत.या कडे शासनाने सहानभूती पूर्वक लक्ष ध्यावे.आतार यांची विनंती आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget