Latest Post

नवी दिल्ली - दि. २५ सप्टेंबर २०१९
सन २०१८- २०१९ मध्ये हवेतील साहसी क्रीडा प्रकारात उत्कृस्ट कार्य केले बद्दल नवी दिल्ली येथील एअरो क्लब ऑफ इंडिया च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्लब चे अधक्ष्य कॅप्टन राजीव प्रताप रुडी यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यातील तिघांना सन्मानित करण्यात आला. त्यामध्ये पॅरा मोटरिंग साठी अहमदनगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, पॅरा जम्पिंग साठी पुणे येथील पद्मश्री शितल महाजन आणि देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून मुंबई फ्लायिंग क्लब चा समावेश होता.
आप्पासाहेब ढुस यांनी २.५ लिटर पेट्रोल मध्ये पॅरा मोटर च्या साह्याने थायलंड मधील  जागतिक स्पर्धेत ३४ किलोमीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदविल्या बद्दल ढुस यांना सन्मानित करण्यात आले, तर जगातील सात ठिकाणी पॅरा जंप करून विक्रम नोंदविल्या बद्दल पुणे च्या शीतल महाजन यांचा सन्मानित करणेत आले.
 तसेच हवेतील साहसी क्रीडा प्रकारात काम करणारा देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लुब ठरल्या बद्दल मुंबई फ्लायिंग क्लब ला सन्मानित केले.

बुलडाणा- 25 सप्टेंबर
बुलडाणा तालुक्यात आज 25 सेप्टेंबरला सायंकाळ पासून जोरदार पाऊसाची बैटिंग सुरु असून पैनगंगा नदीला मोठा पुर आलेला आहे. देऊळघाट व पलसखेड़ नागो, कोलवड, सागवन, येळगांव लगतच्या पैनगंगा नदीवरील पूलावरुण पुराचा पाणी वाहत आहे.पैनगंगेला आलेल्या या पूरा मुळे बुलडाणा-चिखली, बुलडाणा-अजिंठा,बुलडाणा-धाड,बुलडाणा-रायपुर हे 4 मुख्य मार्ग बंद झालेले आहे. येळगांव धरण ओवरफ्लो झाला असून सदर पाणी खालच्या भागात म्हणजे पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पात जात आहे.बुलडाणा तालुक्यातील तांदूळवाडी या गावा जवळ पुराच्या पाण्यात 2 बाइक वाहून गेली सुदैवाने बाइक वरील माणसा सुरक्षित आहे.पैनगंगा नदी काठच्या गावात सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  सावेडीतील बालिकाश्रम रस्त्यावर भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी पस्तीस हजारांचा ऐवज लंपास केला. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली.मंगल सखाराम पंडित या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांच्याच घरात चोरी झाली. पंडित या बालिकाश्रम रस्त्यावरील आर्यन गार्डनच्या डी विंगमध्ये राहतात. दुपारी एक वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केला.



बुलढाणा - 25 सितंबर
बुलढाणा जिले की चिखली विधानसभा से 2 बार काँग्रेस विधायक व काँग्रेस के बुलढाणा जिलाध्यक्ष राहुल बोन्द्रे भाजपा में प्रवेश लेने जा रहे है,,ऐसी ये खबर सोशल मीडिया के माध्यम से  चिखली में फैलते ही भाजपा के जुने कार्यक्रता रास्ते पर उतर आए है.विधायक बोन्द्रे को भाजपा में ना लिया जाए,इस मांग को ले कर चिखली के शिवाजी चौक में आंदोलन किया गया.इस समय भाजपा जिला उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत ने कहा कि,कार्यकर्ता इस लिए नाराज़ है कि,जिस कांग्रेस के विधायक ने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ अपशब्दों का इस्तेमाल किया है उसे पक्ष में प्रवेश देकर उम्मीदवारी देना उचित नही है.भाजपा में मेगा भरती हो रही है ऐसे में यदि कांग्रेस विधायक भाजपा में प्रवेश लेते है तो हमे कोई आपत्ति भी नही किंतु उन्हें प्रत्याशी ना बनाया जाए,ऐसी इच्छा भी उन्होंने सभी आंदोलन कर रहे भाजपा के निष्ठावान कार्यकर्ताओं की ओर से कहा है.बता दे कि चिखली से भाजपा की ओर से चुनाव लडने के लिए जिला परिषद सभापति श्रीमती श्वेताताई महाले, एड.विजय कोठारी,सुरेशअप्पा खबूतरे आदि इच्छुक है.विधायक बोन्द्रे के इस राजकीय दांव ने स्थानिक भाजपा के खेमे में खलबली मचा दी है.


मेरी बदनामी के लिए भाजपा का गेम प्लान!विधायक बोन्द्रे

पिछले 4 महीने से चर्चा कर रहे हैं ये लोग,ये भाजपा का ही गेम प्लान है मुझे जबरदस्ती बदनाम करने का,अपना ऐसा कोई इरादा नही है,अपन पार्टी में ही है,पार्टी के ही है और पार्टी के ही रहेंगे,ये क्लियर अपना स्टैंड है, ऐसा विधायक राहुल बोन्द्रे ने फोन पर अपनी प्रतिक्रिया देते हुए व्यक्त किया है.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या नाकाबंदीत बेहिशोबी रक्कम घेऊन जाणार्‍या राहुरी येथील व्यापार्‍याकडून 2 लाख 70 हजार रुपये महिंद्रा कंपनीच्या जितो या गाडीतून हस्तगत केले. सदरची रक्कम फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देऊन राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतूक, तसेच बेहिशोबी रक्कम व मौल्यवान वस्तू घेऊन जाणार्‍यांवर कारवाई करता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग व नाकाबंदी लावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सुचनेनुसार, शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, पोलीस उपनिरीक्षक जाने, पोलीस नाईक़ जी. ई. सोनवणे, पी. डी. अंधारे, श्री. कुर्‍हे, पोलीस कॉन्स्टेबल मैंद, श्री. पंडोरे तसेच चार होमगार्ड या पथकाने शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करत असताना शिर्डी शहरातीन आरबीएल चौकात लावलेल्या नाकाबंदीत एक महिंद्रा कंपनीची जितो गाडी राहात्याकडून येत असतांना तिला थांबवून गाडीची तपासणी केली असता चालकासोबत असलेल्या राहुरीतीलच व्यापार्‍याच्या ताब्यातून 100 रुपयाच्या 1600 नोटा, 500 रुपयाच्या 200 नोटा, 20 रूपयाच्या 200 नोटा 10 रुपयाच्या 600 नोटा असे मिळून एकूण 2 लाख 70 हजार रुपये मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून या रकमेबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळून आले नाही. त्यामुळे सदर पथकाने सदरची रक्कम जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देवून राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.

बुलडाणा - 24 सप्टेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका कृषि कार्यालयात कार्यरत महिला कृषी सहाय्यक याचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच सोमवारी घडली असून याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध आज 24 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिला कृषी सहाय्यक यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की 23 सप्टेंबर रोजी मोताळा येथे तालुका कृषी अधिकारी के.एल. कंकाळ यांनी फिर्यादीला सोमवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास आपल्या कॅबिनमध्ये बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला व घरी कोणी नसताना मला बोलव असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली, तसेच लज्जास्पद बोलत अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकारामुळे पिडीत महिला कर्मचारी गोंधळुन आरोपीचा हात झटकला. तसेच सदर प्रकार नवऱ्याला सांगते असे म्हटल्यावर आरोपीने प्रशासकीय कारवाईची धमकी दिली. तसेच तू बुलडाणा येथून ये-जा करते, तुला उडवून देईल, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी के.एल.कंकाळ याच्याविरुद्ध भादविची कलम 354 (अ), 506 अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गरुड यांच्या मार्गदर्शनात एएसआय गजानन वाघ करीत आहेत.ही घटना समोर आल्या नंतर जिल्ह्यातील कृषि विभागात एकच खळबळ उडालेली आहे.


अहमदनगर (प्रतिनिधी)  बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्‍लील चाळे करणार्‍या पित्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात 354(अ),सह बालकांचे लैंगिक अपरथाचे संरक्षण अधिनियम 2012 चे क 8,9(छ)/10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य कॉलनीतील या दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. रविवारी रात्री हा विकृत पिता घरी आला. अंगावरील शर्ट काढून त्याने मुलगा आणि मुलगी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने मुलीला उचलून दुसर्‍या खोलीत नेले. तेथे तिच्याशी अश्‍लील चाळे करत नको त्या ठिकाणी हात लावला. जवळ ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पत्नीने पतीविरोधात दिली आहे. भिंगार पोलिसांनी त्या विकृत पित्याविरोधात गुन्हा दाखल केला

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget