December 2025

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारारा ज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणूनउभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

श्री.प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.


श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते

 दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.


 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना   हा पक्ष प्रवेश करण्यात आला  डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”


दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget