सोलापूर/पंढरपूर बलात्कार
करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन तिच्या
आई-वडिलांकडून २ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या ५ तरुणांविरुध्द शुक्रवारी
रात्री उशिरा पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
: शहरातील एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर
सुत्रांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला फसवून अंबाबाई पटांगण
येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामावर नेले. त्याठिकाणी तिला बळजबरीने मद्य
पाजून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच पीडित मुलीवर ऑक्टोबर २०१८,
डिसेंबर २०१८ ते १५ ऑगस्ट २०१९ च्या दुपारी चार वाजेपर्यंत अंबाबाई पटांगण
येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी व विष्णुपद येथील झुडपात
लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडित मुलीच्या आईला व्हिडिओ व्हायरल करण्याची
धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी मनोज माने, आरीफ शेख,
अक्षय दिलीप कोळी, माऊली तुकाराम अंकुशराव, साहील सुधीर अभंगराव, आदी
तरुणांविरुध्द बलात्काराचा
भादवि कलम ३६३, ३७६ (ड), ३७६(२) (एन), ३८४,५०६,३४ सह बालकांचे लैंगिक
अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे कलम ४,६,८,१२,१६,२ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
: शहरातील एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर
Post a Comment