Latest Post

राहुरी (प्रतिनिधी मिनाष पटेकर )वरवंडी मुलानगर ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करिता  विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीची धुरा युवकांनी हाती घेतली असून निष्क्रिय सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखविण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे तसेच जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे जनतेच्या विकासासाठी झटणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरविले आहेत निस्वार्थपणे कायमच जनतेला मदत करणारे सलीम भाई शेख प्रियंका त्रिभुवन अर्चना पवार व मुन्नाभाई परदेशी यांची उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिली असून भरघोस मतांनी निवडून देण्याची प्रतिज्ञा ही घेतली आहे स्ट्रीट लाईट आरोग्य रस्ता गावठाण पर्यटन शिक्षण पाणीपुरवठा या मुद्द्यांवर सतत कार्यरत असणारे सलीम भाई शेख यांना यावेळी उमेदवारी देऊन जनता ऋण फेडण्याच्या विचाराधीन आहे याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली वायसे मामा दिलीप बर्डे कैलास बर्डे आकाश बिराडे राजेश परदेशी जालिंदर गायकवाड किशोर पवार शुभम त्रिभुवन अल्ताफ पठाण साहिल शेख बाळू जाधव सुनील अडसुरे अन्सार पठाण वैभव खरात गणेश मोरे सुनील माळी व सर्व मुळानगर युवावर्ग व संपूर्ण ग्रामस्थ यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्व उमेदवारांनी नाम निर्देशन अर्ज ग्रामपंचायत वरवंडी करिता भरलेले आहे

*

सांगली - आटपाडी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक करत चोरलेला बोकड हस्तगत केले आहे. यानंतर बोकडाच्या मालकांनी पोलिसांचा सत्कार करत गावातून बोकडाची मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे. दीड कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सोमनाथ जाधव यांच्या या महागड्या बकऱ्याची हाय प्रोफाईल पद्धतीने एका आलिशान गाडीतून चोरी झाल्याचे समोर आले होते. 

या घटनेमुळे आटपाडी नव्हेचं तर सांगली जिल्ह्यातील खळबळ उडाली होती. महागड्या बोकडाची झालेल्या चोरीमुळे बोकड मालका सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात बोकड चोरीचा गुन्हा दाखल केले होता. 16 लाखांचा बोकड चोरीच्या घटनेमुळे आटपाडी पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास सुरू केला होता. आणि तपास सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका संशयित गाडीतून बकरा घेऊन काही जण आल्याची माहिती मिळाली आणि विटा पोलिसांनी यावेळी तिघा संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असणारे बोकड ताब्यात घेतल आहे.

आटपाडी पोलिसांनी चोरीला गेलेला बोकड शोधून काढण्याची माहिती मिळताच सोमनाथ जाधव आणि आटपाडी येथील ग्रामस्थ हे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जमले आणि चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचा सत्कार करत, आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आटपाडी शहरातून 16 लाखांच्या बोकडाची जंगी मिरवणूक काढली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत स्थापनेला शभंर वर्ष पुर्ण होत असुन गावात निवडणूक निमित्ताने होणारी कटुता पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व गावचा । विकास होण्यासाठी बेलापुर पत्रकार  संघाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेला पुढाकार योग्य असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले आहे           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावाची लोकसंख्या २५ हजार असुन १४ हजार मतदार आहेत या सर्व लोकाच्या हिताचे निर्णय घेणारे काही ठराविकच लोक आहेत गावाच्या हिताचे निर्णय घेणार्या पुढार्यांनी गाव हे केंद्रस्थानी ठेवुन ही निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी मनापासुन सहकार्य करावे गावातील अनेक नागरीकांचीही तशीच इच्छा आहे सर्व नेते मंडळींना विनंती आहे की  गाव महत्वाचे की नाव हे आपणच ठरवायचे आहे बेलापुर पत्रकार संघाने गावांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असुन सर्वांनी गट तट मतभेत बाजुला ठेवुन गावचा ईतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहीजे सर्वांनी मनावर घेतले तर काहीच  अवघड नाही तसेच कुणावरही दबाव न आणता आपण ही निवडणूक बिनविरोध करावी गावासाठी सर्वांनी दोन पावले मागे यावे आपणाला तालुका जिल्हा पातळीवर कारखाना बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद अशा इतर निवडणूका आहेत गावात सलोख्याचे चांगले वातावरण ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून गावच्या विकासाचा एक कृती आराखडा ठरवुन काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही काल काय झाले कुणी काय केले  हे सर्व मतभेद विसरुन स्वच्छ मनाने उद्याच्या सुंस्कृत  बेलापुर गावाकरीता एकत्र होवुन गावची निवडणूक बिनविरोध करु या असेही जि प सदर शरद नवले यांनी म्हटले आहे.

बेलापुर(वार्ताहर)गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कोनाचीही गय केली जाणार नाही, असा ईशारा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेलापुर पोलीस चौकीत विविध पक्षांचे स्थानिक प्रमुख, पत्रकार व ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ते सोडून जर कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर ताबडतोब पोलीसांना कळवा आम्ही त्यांच्यावर  कोणताही पक्षपात न करता त्वरित गुन्हे दाखल करु असेही नोपानी यांनी यावेळी आश्वाशीत केले.*या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई माजी सरपंच  भरत साळुंके पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा द्वारकनाथ बडधे प्रा अशोक बडधे आदिंनी मनोगत व्याक्त केले या बैठकीला सर्वश्री ,रविंद्र खटोड ,पोलीस पाटील अशोक प्रधान, अशोक प्रधान,युवराज जोशी,कैलास चायल, अशोक पवार, जावेद शेख, अकबर सय्यद,प्रा. अशोक बडधे,अजय डाकले, द्वारकानाथ बडधे, पत्रकार ज्ञानेश गवले, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, अशोक शेलार,यांच्यासह पो. हे. कॉ. अतुल लोटके, रामेश्वर ढोकने, निखिल तमनर, हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर समाजाने शाबासाकीची थाप दिल्यास असे कार्य करणारांचा उत्साह वाढतो त्यामुळे असे कार्यक्रम सर्वच स्तरावर राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी केले                                           नाताळ सणाचे औचित्य साधुन शालोम ए जी चर्च बेलापुर यांच्या वतीने कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन सामाजाची काळजी घेणार्या सर्व क्षेत्रात काम करणार्या बांधवांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे डाँ देविदास चोखर हवालदार अतुल लोटके उपस्थित होते                     या वेळी बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पंडीत सिस्टर आदिंनी मनोगत व्यक्त केले 

शालोम ए जी चर्चचे पास्टर अलिशा जोगदंड यांनी कोरोना सारखे संकट पुन्हा येवु नये सर्वांना सुख शांती मिळावी या साठी प्रार्थना केली या वेळी बेलापुर पोलीस स्टेशनचे निखील तमनर बेलापुर पत्रकार सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम कामगार तलाठी कैलास खाडे अविनाश शेलार बाबासाहेब प्रधान सुशिलाबाई खरात मधुकर गायकवाड जालीदर गाढे अमोल साळवे सचिन साळुंके आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी महसुल कर्मचारी बेलापुर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषीकेश जाधव प्रसाद शेलार ललीत शेलार निशिकांत शेलार संकेत गीरमे प्रसाद अमोलीक गौरव शेलार आदिनी विशेष प्रयत्न केले ऋषीकेश जाधव यांनी आभार मानले.

अहमदनगर- नगर शहरातील दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौकात पोलिसांनी थांबवलेल्या मोटारीत चार धारदार तलवारी सापडल्या. मोटारीतील ड्रायव्हर सीटच्या मागे पांढऱ्या गोणीत या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पकडण्यात आलेल्याचे नाव अशोक बाळासाहेब राळभाते (रा.रत्नापूर, ता.जामखेड) आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई एलसीबी पथकाने केली.
याबाबतची माहिती अशी की, पो.हेकॉ संदीप घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती कि, अशोक राळेभात (रा. रत्नापूर, ता.जामखेड) हा त्याचे ताब्यातील चारचाकी मोटारीतून चार तलवारी घेवून दिल्ली गेटकडून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणार असल्याची ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी नीलक्रांती चौकात फौजफाटा तैनात केला होता व ही गाडी आल्यावर पंचांसमक्ष तिची झडती घेतली. कारमध्ये ड्रायव्हर सीटचे पाठीमागील बाजूस एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये ३ हजार ८०० रुपये किमतीच्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. या तलवारींबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती सांगितली नाही. त्यामुळे या तलवारी व तसेच ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत म्हणजे ३०डिसेंबर रोजी  सर्व पक्षीय बैठक घेवुन बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा या सर्वपक्षिय प्रमुखांनी  मांडलेल्या सुचनेला  कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.                                        श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर बु!! गावाची ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी रोजी होत असुन १७ जागेकरीता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव बेलापुर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळीसमोर मांडला होता या प्रस्तावास सर्वपक्षिय  प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर काल पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक  बोलविण्यात आली होती.  त्या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत बेलापुर ग्रामपंचायत  सदस्य निवडी बाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली. या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी सांगितले की संर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला पँनलचे उमेदवारी अर्ज दाखल करुन दिनांक ३०डिसेंबर रोजी सर्व उमेदवार यांची माहीती तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा फाँर्म कोअर कमिटीकडे जमा करावेत. या सर्व अर्जातुन सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हा सतरा जणाचा पँनल हा गावचा पँनल असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावाचा पँनल विरुध्द ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष  गट तट विसरुन एकत्र होवुन गावाच्या निर्णया विरुध्द जाणाऱ्या  उमेदवारांविरुध्द विरोधात सर्वपक्षिय  नेते मंडळी प्रचार करतील या मुथा यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले,माजी सरपंच भरत साळुंके, भाजपाचे शहर प्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले ,विक्रम नाईक,  हाजी ईस्माईल शेख आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनिवरुन या प्रस्तावास संमती दिली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, सुनील मुथा,नवनाथ कुताळ,ज्ञानेश्वर गवले दिलीप दायमा आदि उपस्थित होते शेवटी पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget