Latest Post

बुलडाणा- 7 नोव्हे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मागील 24 डिसेंबर 2018 पासुन ईपीएस पेंशनधारक आपल्या मागण्या घेऊन साखळी उपोषण करीत आहे आज त्यांचे आंदोलन चिघडले व पोलिस व आंदोलन करणाऱ्या मध्ये धक्काबुक्की झाली आहे.
      देशातील निमशासकीय पेंशनधारकाना पेंशनवाढ मिळावी यासाठी ईपीएस संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मागील 318 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहे, मात्र शासन या पेंशनधारकाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज पेंशनधारकानी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ एसबीआई चौकात विनापरवानगी रास्तारोको आंदोलन करीत रस्त्यावर झोपून आंदोलन करीत वाहन अडवून ट्रैफिक जाम केला होता. ट्राफिक पुन्हा सुरु व्हावे म्हणून पेंशनधारकाना तेथून हटविले. सर्व आंदोलक आपल्या मंडप कडे येत असतांना पीएसआई अभय पवार यांनी ऐका आंदोलका कडून माइक हिसकला व या मुळे आंदोलक चिघडले व पोलीस व आंदोलका मध्ये लोटपाट झाली.विशेष म्हणजे ही घटना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक  यांच्या कार्यल्यासमोरच घडली असल्याने परिसरात चांगलाच तनाव व गोंधळ निर्माण झाला होता. चिडलेल्या पेंशनधारकानी पोलिसांना सुद्धा लोटपाट केलीय. मात्र काहीवेळातच मध्यस्थी झाल्याने हा वाद मिटला मात्र या प्रकरणी पेंशनधारक आंदोलकावर पोलीस काय कार्यवाई करते याच्या कडे लक्ष लागले आहे.

मुंबई : अलिबाग समुद्रकिनाºयालगतच बड्या व ताकदवर (आर्थिक) लोकांचे बंगले आहेत. हे बंगले बांधण्यासाठी सरकारची परवानगी घेण्याची त्यांनी तसदीही घेतली नाही. अशा लोकांच्या अनधिकृत बांधकामांवर सरकार कारवाई करणार आहे की नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. तसेच हे प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने थेट रायगड जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावले.सीआरझेडचे उल्लंघन करून अलिबाग समुद्रकिनाºयालगत उभ्या असलेल्या बंगल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र धवले यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती.अलिबागमध्ये एमसीझेडएमएचे उल्लंघन करून अनेक बंगले बांधण्यात आले आहेत, असे न्यायालयाने म्हटले. गेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाºयांना दिला होता. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने आतापर्यंत किती बंगल्यांवर कारवाई करण्यात आली, असा सवाल केला. त्यावर २४ बंगल्यांवर कारवाई केली असून त्यात पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या बंगल्याचाही समावेश आहे. ‘उर्वरित १११ बंगल्यांना नोटीस बजाविली. मात्र, त्यांना कनिष्ठ न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्याने कारवाई करू शकत नाही,’ असे सरकारी वकिलांनी सांगितले. काही लोकांनी केसेस मागे घेतल्या तर काही प्रकरणांत न्यायालयाने राज्य सरकारचा दावा फेटाळला, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ‘ज्या प्रकरणांत सरकारचे दावे फेटाळले आहेत, त्याविरुद्ध अपील केले आहे का,’ या न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयात अपील केल्याची माहिती दिली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातून एकही अधिकारी उपस्थित नसल्याने सरकारी वकील निश्चित आकडेवारी खंडपीठासमोर सादर करू शकले नाहीत. याबाबत न्यायालयाने नाराजी दर्शविली. तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांना ११ नोव्हेंबर रोजी सर्व कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.

हमदनगर (प्रतिनिधी) शाळेत गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख कांता गणपत घावटे व कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे यांना तात्पुरते निलंबित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी बुधवारी (दि. 6) काढला. यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.कांता घावटे बारगाव नांदूर केंद्र शाळेत केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग केला होता. यावर राहुरी गटशिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला होता. यानंतर नगर व जामखेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी संयुक्त चौकशी करून जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होता. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना काही काळासाठी पदावरून दूर केले आहे. याकालावधीत शेवगाव पंचायत समिती मुख्यालयात त्या कार्यरत असणार आहे. तेथील गट शिक्षणाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष सोनवणे पदावर असताना त्यांनीही महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 नियम 3 चा भंग केला होता. कोपरगाव गटशिक्षणाधिकार्‍यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर केला होता. तसेच राहता गटशिक्षणाधिकारी व श्रीरामपूर विस्तार अधिकार्‍यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी पदावरून काही काळासाठी दूर केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे मुख्यालय श्रीगोंदा पंचायत समिती असणार आहे. तेथील गटशिक्षणाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

राहाता (प्रतिनिधी) नगर-कोपरगाव महामार्गाच्या दुरुस्तीसाठी संतप्त शिवसैनिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावरील पिंपरी निर्मळ येथील टोल नाका बंद पाडला. जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.नगर-शिर्डी-कोपरगाव या महामार्गाची प्रचंड दैना झाली असून सर्व मार्ग खड्ड्यात हरवला आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडून अनेकांचे बळी जात असताना या मार्गाची दुरुस्ती न करता केवळ टोल वसुली केली जाते. वारंवार मागणी करूनही दुरुस्तीकडे कानाडोळा करणार्‍या सुप्रिम कंपनी विरोधात नागरिक, साईभक्त व प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती.नागरिकांच्या तक्रारीची शिवसैनिकांनी दखल घेत खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम राहाता तहसील कार्यालयात जाऊन धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेना नेते प्रमोद लबडे, नितीन औताडे, कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राजेंद्र पठारे, अक्षय तळेकर, धनंजय गाडेकर, ज्ञानदेव पवार, अमोल गायके, अनिल बांगरे, पुंडलीक बावके, दिनेश आसने, राजेंद्र देवकर, गणेश सोमवंशी, अशोक गोंदकर, राहुल गोंदकर, अनिल पवार, गंगाराम कांदळकर, बाळासाहेब पवार, संभाजी पेरणे, सनी वाघ, सागर कोते, शुभम ताम्हाणे, किरण जपे, दिनेश पवार यानी धरणे आंदोलन करत प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, जागतीक बँक प्रकल्प अधिकारी ए. जी. मेहेत्रे यांना निवेदन देत जोपर्यंत महामार्ग दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी तसा आदेश द्यावा, अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी केली. त्यानंतर खा. लोखंडे यांनी शिवसैनिकांसह पिंपरी निर्मळ येथे जात स्वतः टोलनाक्याला टाळे ठोकले व काही वेळ तेथे बैठा सत्याग्रह केला.यावेळी खा लोखंडे म्हणाले, नागरिकांना चांगला रस्ता मिळावा म्हणून टोल आकारला जातो. मात्र या मार्गावर केवळ टोल आकारला जात असून रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. दोन महिन्यात या मार्गावर खड्ड्यामुळे पाच जणांचे बळी गेले. याला जबाबदार कोण? नगर ते कोपरगाव रस्ता व शिर्डी बाह्यवळण रस्ता तातडीने दुरूस्त करा मगच टोल सुरू करा. जोपर्यंत रस्ता खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल सुरू करू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.तसेच तहसिलदार, कृषी अधिकारी व विमा कंपनी अधिकारी यांनी सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे करावे. शेतात व खळ्यात पडलेल्या सोयाबीनचे वेगळे पंचनामे न करता सरसगट पंचनामे करून हतबल शेतकर्‍याला मदत करण्याचे अहवान केले. तसेच राहाता तालुक्यातील पेरू व फळबागांचेही पंचनामे करावे तसेच चारा पिकांचेही पंचनामे करा, अशा सुचना लोखंडे यांनी केल्या. विमा कंपनीचा एक अधिकारी शेतकर्‍यांची अडवणूक करतो, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी करताच त्या अधिकार्‍याला खा. लोखंडे यांनी शिवसेना स्टाईलने फटकारले. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमूख प्रमोद लबडे कमलाकर कोते राजेंद्र पठारे व नितीन औताडे यांची भाषणे झाली. सुप्रिमचा टोलनाका बंद पाडला खासदार लोखंडे व संतप्त शिवसैनिकांनी थेट पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर जात तेथील व्यवस्थापकाला बोलावून रस्ता जोपर्यंत दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल बंद करा टोल वसूल करू नका, अशा सूचना करत स्वतः खा. लोखंडे यांनी टोल वसूल करणार्‍या बूथला कुलूप लावले. यावेळी जागतिक बँक प्रकल्प अधिकारीही येथे उपस्थित होते.

सिल्लोड, प्रतिनिधी : मान्सनोत्तर पावसात पिके व चारा कुजल्याच्या विरहाने कृष्णा एकनाथ काकडे (38 रा. पूर्णावाडी, धानोरा) या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. बुधवारी त्यांच्या कुटुंबाची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देऊ असे सांगत धीर दिला.

    मयत शेतकऱ्याला धानोरा शिवारात गट नं. 293 मध्ये अवघी एक एकर शेती आहे. यामुळे ते दुग्ध व्यवसाय करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु परतीच्या पावसाने सोंगनी केलेल्या मकाच्या कणसाला कोंब फुटली, तर चारा वाहून गेला. यामुळे दुभत्या गायीला काय खाऊ घालणार अशा तणावात ते होते.

     कुटुंबातील कर्ताच माणूस गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाची माजी आ. सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, माजी सरपंच माधवराव काकडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

बुलढाणा- 6 नवंबर
राष्ट्रीय पक्षी मोर का शिकार कर उसके मांस की भाजी बना कर खानेवाले 3 आरोपियों को वन विभाग ने गिरफ्तार किया है.आरोपियों को कोर्ट ने आगामी 8 नवंबर तक वन कस्टडी में भेज दिया गया है.इस कार्रवाई के बाद इलाके में खलबली मची हुई है.
     बुलढाणा आरएफओ गणेश टेकाले को गुप्त जानकारी मिली के ग्राम मोज के पास कुछ लोग मोर का शिकार कर उसके मांस को पका कर खाने वाले हैं पश्चात बुलढाणा डीएफओ संजय माली,एसीएफ आर.आर.गायकवाड के मार्गदर्शन में कल 6 नवंबर की रात में आरएफओ गणेश टेकाले के नेतृत्व में वनकर्मी एच. पवार,के.बी.शेख,अंकुश बाभुलकर, रेस्क्यु टीम के प्रमुख राहुल चौहान,समाधान मांटे,संदीप मडावी,सुरेश भालेराव,विष्णु काकड व स्वप्निल वानखेडे आदि का एक दल तैयार मोहज की दिशा में भेजा गया तब गुट क्र.20 के एक खेत में एक सीमेंट के कमरे में 3 लोग मिले जिनके पास से राष्ट्रीय पक्षी मोर का पका हुआ और कच्चा मांस,बारा बोर की बंदूक,मांस काटनेवाले तेज़ हथियार आदि साहित्य जब्त किया गया.इन तीनो को पकड़कर बुलढाणा वन विभाग के कार्यालय में लाया गया.आरोपी संतोष शेनफड नरोटे,सचिन विजय नरोटे दोनों देवपुर निवासी तथा समाधान तेजराव वाघ निवासी सावली के खिलाफ भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 की धारा 9,39,51 के तहत तथा भारतीय वन अधिनियम 1927 की धारा 26(1) आई के तहत अपराध दर्ज कर तीनो आरोपियों को आज कोर्ट में भेजा गया जिन्हें आगामी 8 नवंबर तक वन कस्टडी में भेज दिया गया है.मामले की अधिक जांच एसीएफ गायकवाड व आरएफओ टेकाले कर रहे है.
    बता दे कि,मोहज, मालशेंबा,रोईखेड़ मायंबा,सावली,आदि इलाका जालना जिले की सीमा से सटा हुआ है तथा यहां वन्यजीव भी अधिक संख्या में होने के कारण अक्सर शिकारी यहां पर वन्यजीवों का शिकार करते हुए शराब के साथ पार्टी मनाते है.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. भाजपाने चर्चेची दारं खुली असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, कोणताही प्रस्ताव आला नाही अन् पाठवणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा -शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर सहमती झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget