Latest Post

नाशिक । प्रतिनिधी टोलनाके गर्दीमुक्त करण्यासाठी आणि वाहनधारकांच्या वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी फास्टॅग अंमलबजावणीस उद्या शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांसह सर्वच टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन राहील. फास्टॅग वाहनांसाठीच इतर सर्व लेन उपलब्ध राहतील.‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच वाहानांनी टोलनाक्यावर फास्टॅगद्वारेच ऑनलाईन आपला टोल भरणे अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून होणार होती. परंतु तयारीअभावी आणि फास्टॅग उपलब्धतेच्या संभ्रमामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली. आता हा नियम 15 डिसेंबरपासून लागू होणार आहे. यादरम्यान मोफत फास्टॅग नोंदणीही केली जात होती. पण 15 डिसेंबरनंतर मात्र आता सर्वच वाहनधारकांना त्यासाठी आवश्यक असलेले 100 रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.त्यामुळे फास्टॅग लेनमधून बिगर फास्टॅग वाहन गेल्यास फास्टॅग वाहनांचा वेळ वाया जाईल. त्यामुळे संबंधित बिगर फास्टॅगधारक वाहनास दुप्पट टोल लागेल. परंतु जर नियमित टोलधारकांसाठी असलेल्या लेनमधूनचे त्याने प्रवास केला तर मात्र दुप्पट आकारणी होणार नाही. फास्टॅगची सुविधा टोलनाक्यांवर तर आहेच. शहरातील वाहनधारकांना आयडीएफसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक तसेच एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँकेच्या विविध शाखांमध्ये तसेच अ‍ॅमेझॉनवरही ती ऑनलाईन उपलब्ध आहे

अमरावती महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय. बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.आंध्रच्या विधानसभेत या दिशा विधेयकाला मंजुरी देण्यात आलीय. एफआयआर दाखल झाल्यानंतर 7 दिवसांत तपास आणि पुढील 14 दिवसांत खटला संपवण्यात येणार आहे.बलात्कार्‍याला कठोरात कठोर शिक्षा आणि ती सुद्धा अवघ्या 21 दिवसात देण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा विधेयक 2011 आणण्याचा निर्णय घेतलाय.या प्रस्तावित विधेयकात बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची तरतूद आहे. आंध्र विधानसभेच्या चालू अधिवेशनात हे विधेयक पटलावर मांडण्यात आले होते. ते बहुमताने मंजूर झाले आहे.या नव्या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो.या प्रकरणांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.एन्काऊंटर प्रकरणी आयोगाची स्थापना हैदराबाद येथील कथित एन्काऊंटरचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आयोगाची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती वी एस सिरपुरकर हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत.तर, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती रेखा बलडोटा आणि माजी सीबीआय प्रमुख वी. एस. कार्तिकेयन हे या आयोगाचे सदस्य असणार आहेत.

सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी ह्यांना विनंती आहे कि, कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पुणतांबा फाटा ते शिर्डी जाणारे रोडवर हॉटेल स्वस्तिक चे अलीकडे अंदाजे 500 मीटर अलीकडे 25 फूट आत  शेती महामंडळचे जागेत वरील मृत इसमाचा गळा व दोन्ही हाताने नस कापलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. तरी आपल्या पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल असल्यास किंवा कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास,किंवा नागरिकांना ओळख पटल्यास , कृपया 1)कोपरगाव शहर पोलिस स्टेशन- 02423222333, 2) पो नि राकेश मानगांवकर- 8888841988, 3) सपोनि दीपक बोरसे-9409737394 किंवा4) पोउपनी भरत नागरे - 9420024412 ह्या नंबरवर संपर्क साधावा


मुंबई:उध्दव ठाकरे सरकार सत्तेवर येवून १५ दिवस झाले नाहीत तोच मंत्रालयात आत्महत्या करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. प्रियंका गुप्ता या महिलेने मंत्रालयाच्या गँलरीतून उडीमारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीसांना मारहाण प्रकरणात तिच्या पतीला अटक केली आहे.मध्यरात्री उशिरापर्यंत बेकायदा ज्यूस सेंटर सुरु ठेवत असल्याने पोलिसांनी कारवाई करत तिच्या पतीला अटक केली आहे. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीला सोडविण्याच्या मागणीसाठी ती सचिवांकडे दाद मागण्यासाठी मंत्रालयात आली होती. मात्र ज्येष्ठ अधिकारी तिला भेटले नाहीत त्यातून निराश होत तिने उडी मारूनजीव देण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मंत्रालय सुरक्षा पोलिसांनी दिली आहे.सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याने ती जळीवर पडल्याने तिचा जीव वाचला आहे. पोलिसांनी ताब्यात घेवून तिची चौकशी केली आहे. या महिलेला मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नेण्यात आले तेथे रितसर जबाब नोंदवून तिला सेंट जॉर्ज रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दुपारच्या चारच्या सुमारास मंत्रालयात आलेल्या या महिलेने मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली.यापूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.तर अहमदनगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती.त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होते. मंत्रालयात येऊन आत्महत्या किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन तत्कालीन फडणवीस सरकारने मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला जाळी बसवली आहे

बुलडाणा- 13 डिसेंबर
शासनाने नागरिकता संशोधन बिल(CAB) राज्यसभेत पास केल. यात भारतीय नागरिकतेसाठी धर्माचा आधार देण्यात आलेला आहे. जो संविधानाच्या अनुच्छेद 14 व 15 चा अपमान आहे. यावर जमिअत उलमा ए हिंदच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालया तसेच प्रत्येक तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती याना एक निवेदन पाठवून जाचक असे नागरिकता संशोधन बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
        केंद्र शासनाने नागरिकता संशोधन बिल 2019 आणले. मात्र यात संविधानाने दिलेल्या धर्म निरपेक्षतेला तळा जाईल तेव्हा नागरिकता संशोधन बिलात सांगण्यात आले की, शेजारील राष्ट्रात असलेल्या अल्पसंख्याक उतपीडित शरणार्थी नागरिकांना नागरिकता देण्यासाठी आणला. मात्र यात देण्यात येणारी नागरिकता धर्माच्या आधारे आहे जे भेदभाव दर्शवितो, संविधानाच्या अनुच्छेद 14 व 15 नुसार प्रत्येकाला समान दर्जा देण्यात
आलेला आहे. कोणालाच धर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही असे असतांना नवीन नागरिकता संशोधन बिल या विरुद्ध आहे तर 1985 च्या आसाम समझोता करार सुद्धा संपुष्टात येईल, विविधतेने नटलेल्या भारत देशात धर्माच्या आधारे करण्यात येणारे नागरिकता संशोधन हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे. तेव्हा असे जाचक बिल रद्द करण्यासाठी जमिअत उलेमा ए हिंद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले व महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी या आंदोलनात मौलाना शरीफ, मौलाना साहिल, जाकीर कुरेशी,जुनेद डोंगरे, अ‍ॅड.राज शेख, तारीक नदीम, इशु आजाद, जावेद शेख,शे. आसीम, साबीर अली, अलताफ खान, जुबेर खान यांच्यासह असंख्य मुस्लीम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.या व्यतिरिक्त जिल्ह्यातील खामगांव, शेगांव, चिखली,मेहकर,मोताला या ठिकाणी ही धरणे आंदोलन करण्यात आले.

(बुलडाणा- 13 डिसेंबर )5 महिन्यात तब्बल 13 शे किलोमीटरचा लांब पल्ला गाठत यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर पडत "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला असून 10 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर पहिल्यांदाच सदर वाघ जंगलात लावलेल्या एका ट्रैप कैमऱ्यात कैद झाल्याने वन्यजीव विभाग वाघाच्या संरक्षणासाठी सतर्क झालेला आहे,हा वाघ आपल्या नवीन टेरोटेरी तसेच वाघिनच्या शोधात  असल्याची शक्यता अकोला वन्यजीव विभागाचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांनी वर्तवली आहे.
        बुलडाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध पशु-पक्षीचे अधिवास आहे.मागील 1 डिसेंबरच्या रात्री "C1" नावाचा पट्टेदार वाघ या अभ्यारण्यात दाखल झाला असून त्याची प्रत्येक हालचालीवर वन्यजीव विभाग लक्ष ठेवून आहे.दोन दिवस अगोदर जंगलात लावलेल्या ट्रॅप कैमऱ्यात एका ठिकाणी रात्रीच्या वेळी हा वाघ कैद झाला आहे. रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघाचा पाठलाग तर सुरुच होता पण आता त्याचा फोटो हाती आल्यानंतर वन्यजीव विभाग अजुन सतर्क झालेला असून त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे.
        यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास करत असतांना त्याला फक्त बुलडाणा जिल्ह्यातील माटरगांव परिसरात एका व्यक्तिने पाहिले होते.मागील 12 दिवसापासून सदर वाघ या अभयारण्यात थांबलेला आसुन तो पूर्ण जंगलात फिरून पाहणी करीत आहे. अभयरण्यातून जाणारा मार्ग रात्री 10 ते साकाळी 5 वाजे पर्यंत काटेकोरपणे बंद ठेवावे,वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी मार्गावर गतिरोधक बसविन्यात यावे,C1 वाघाच्या संरक्षणासाठी वन्यजीव विभाग,प्रादेशिक वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे काम करावे अश्या महत्वपूर्ण मुद्द्यावार 10 डिसेंबरला आयोजित जिल्हा व्यघ्र समितीच्या बैठकीत चर्चा झाली.अस्वलांच्या आधिवासासाठी प्रसिद्ध असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. वाघ हा प्राणी राहण्यास इथले  वातावरण अनुकूल असून वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हा वाघ ज्ञानगंगेत राहू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


एकदम आला रसत्यावर वाघ

खामगांवहुन आमचा काम अटपुन कारने बुलडाणा कडे येत असतांना ज्ञानगंगा अभयारण्य सुरु झाला व मुख्य घाट चढत असतांना एक भलामोठा आमच्या समोरून मार्ग क्रॉस करुण आत जंगलात निघुन गेला.सदर वाघ एकदम रुबाबदार,ऐठदार शैलीने त्याला जाताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले,वाघ समोर येताच आम्ही घाबरलो व कारचे काच बंद केले, आमची कारच्या सोबतच एक बाइक चालकाने व समोरून येणारी कार मधील लोकांनी ही या वाघाला पाहिला असल्याची माहिती C1 वाघाला प्रत्यक्ष पाहणारे अंढेरा फाटा येथील पत्रकार खंडू मान्टे यांनी दिली आहे. त्यांना हा वाघ 11 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजेच्या दरम्यान दिसून आला.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णय येणं अद्याप प्रतिसंख्येत आहे. मात्र, तिहार कारागृहात वातावरण काहीसं बदलेलं आहे. तिहार कारागृहातील निर्भया प्रकरणातील मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याबाबत कुणकुण लागली आहे. त्यामुळे या चौघांची झोप उडाली असून भीतीने त्यांनी अन्नपाणी खाणं सोडले आहे. चौघांची उडाली झोप; मारतात फक्त चक्करा निर्भया सामूहिक बलात्कारातील अक्षय, मुकेश आणि मंडोली कारागृहातून तिहार कारागृहात हलविलेला पवन हे तीन दोषींना तिहार कारागृहातील वॉर्ड नंबर - ३ मधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर चौथा आरोपी विनय याला जेल नंबर - ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. य सर्वांची झोप उडाली आहे. फाशीची तारीख जवळ येत असल्याने यांच्या मानत भीती निर्माण झाली आहे. हे चौघे आपापल्या सेलमध्ये रात्र - रात्र जागून चक्करा मारत असतात. दोषींना औषाहध देण्यात आले नसून या चौघांना रक्तदाब योग्य राहील अशा पद्धतीचे द्रव आणि घन पदार्थ खाण्यास दिले जात आहेत. दया याचिकेवर अद्याप राष्ट्रपतींकडून अंतिम निर्णय येणे बाकी असून तिहार कारागृहात मात्र फाशीची जागा आणि इतर सामानाची तयारी सुरु झाली आहे. दोषींना १६ डिसेंबर अथवा २९ डिसेंबर (ज्या दिवशी निर्भयाचा मृत्यू झाला) या दिवशी फाशी दिली जाऊ शकते. बक्सर कारागृहातून मागवणार फास बिहार येथील बक्सर मध्यवर्ती कारागृहात फाशीसाठी लागणाऱ्या फास बनविण्याची तयारी सुरु आहे. बक्सर कारागृहातील कैदी हा फास तयार करीत आहेत. २०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता आणि नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी निर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.उत्तर प्रदेशातून मागवले जाऊ शकतात जल्लाद अधिकाऱ्याने म्हणणे आहे की, तसेही फाशी देण्यासाठी जल्लादाची काही गरज नाही. मात्र, गरज पडल्यास उत्तर प्रदेशातून, महारष्ट्रातू अथवा बंगला येथील जल्लाद बोलावले जाऊ शकतात.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget