Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे कोरोना जागरूकता अभियान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे . तरी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने या  आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रिजवानुल हसन यांनी केले आहे .

रविवार ते मंगळवार 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सदरचे आरोग्य तपासणी शिबिर संजय नगर जवळील ईदगाह मैदान शेजारी आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये ताप,सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांबाबत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरजू रुग्णांना औषधे सुद्धा दिली जाणार आहेत.कोरोनाच्या काळामध्ये मालेगाव पॅटर्न कमालीचा यशस्वी झाला असून मालेगाव पॅटर्न मध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर्स हे आपल्या शहरात येऊन मार्ग दर्शन करणार आहेत. तरी या शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुफ्ती रिजवानुल हसन, हाजी जलील काझी, सलीमखान पठाण,साजीद मिर्झा, सोहेल बारूद वाला,डॉ. तौफीक शेख, डॉ. नाजीम शेख, डॉ. मतीन शेख, आदिल मखदुमी, महेबूब कुरेशी, फिरोज पठाण तसेच संविधान बचाव समिती, लब्बैक ग्रुप, गरीबनवाज फौंडेशन, उर्दू साहित्य परिषद,मिल्लत ए इब्राहिम ग्रुप, सुलतान नगर ग्रुप आदि संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- अधिकारी देखील माणूसच असतो अन त्या अधिकार्यातही माणूसकी दडलेली असते याचा प्रत्यय श्रीरामपुर तहसील कार्यालयात आलेल्या एका वृध्द महीलेला आहे                                  त्याचे झाले असे की वृध्द महीला पुरुषांना शासनाच्या विविध योजनेचे मानधन मिळत असते मात्र अनुदान सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वेळोवेळी हयातीचे व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात संजय निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली एक वयोवृध्द महीला तहसील कार्यालयात तळमजल्यावर बसलेली होती सकाळी नेहमी प्रमाणे तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले जिन्याच्या पायर्या चढत असाताना त्यांची नजर त्या वृध्द महीलेवर गेली ही  महीला येथे आली म्हणजे हिचे नक्कीच तहसील कार्यालयात रेशन र्काडाचे काम असावे अशी शंका आली जिना उतरुन ते त्या आजीबाई जवळ आले अतिशय वयोवृध्द झालेल्या त्या महीलेस

तहसीलदार पाटील यांनी विचारले की आजी काय काम आहे त्यावर त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे परंतु काही कागदपत्रे जमा नाही केली तर तो बंद होईल असा निरोप आल्यामुळे गावातुन आले  तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पहात असलेल्या अधिकाऱ्यांस खाली बोलविले अन सर्व कागदपत्रांची पूर्तता बघुन घेण्यास सांगितले तो पर्यत पाटील हे तिथेच उभे राहीले त्या आजी बाईचे काम झाल्यावर तहसीलदार पाटील हे कार्यालयात जाण्यासाठी जिना चढु लागले तोच त्या आजी बाईंनी पुन्हा हाक मारली तहसीलदार पाटील यांना वाटले आणखी काही काम बाकी असेल म्हणून हाक मारली असेल ते पुन्हा त्या आजी बाई जवळ गेले व आस्थेने विचारले की तुमचे काम झाले का अजुन बाकी आहे आजी बाई म्हणाल्या काम तर झाले पण दोन चार रुपये दिले असते तर फार बरे झाले असते गावाकड जायला तहसीलदार पाटील यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयाची नोट काढुन त्या आजी बाईला दिली अन क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले हे सर्व तिथे उभे असलेले नागरीक पहात होते एकाने त्या आजीबाई जवळ जावुन विचारले आजी तो माणूस कोण होता माहीती आहे का त्यावर आजी म्हणाली नाही कोण होता त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहे अन मग आजीबाईच्या डोळ्यात खळकन पाणी आले अन आजीबाई इतकच म्हणाल्या त्यांच्या रुपात माझा देवच आला होता मला मदत कराया.


 बेलापूर (प्रतिनिधी  )-  टी बस आता माल वहातुक सेवेतही दाखल झाली असुन एफ सी आय गोदामातुन शासकीय धान्याची पोती भरुन आता लाल परी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे         लाँक डाऊन काळात प्रवासी वहातुक बंद असल्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात आले बस स्थानक ओस पडले  मग एस टी महामंडळाने वहातुक सेवा एस टी  महामंडळा मार्फत सुरु करण्याचा निर्णय घेतला अहमदनगर जिल्ह्यातही एस टी बसने माल वहातुक सुरु करण्यात आली आता शासकीय गोदामातही लालपरी धावणार आहे बसचा वरील टप कापुन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली असुन आतील भाग बाकडे काढुन मोकळा करण्यात आला आहे आता एफ सी आय गोदामात लाल परीत शासकीय गहु तांदूळ भरला जात आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वहातुक केली जाणार आहे बसमधुन शासकीय  मालाची वहातुक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.


मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावचे भुमिपुत्र तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल,डाऊच खर्द या स्कुल चे संस्थापक सचिव मा श्री सुनिल भास्करराव होन यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने हा त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा.ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी माते मुळे पावन झालेल्या चांदेकसारे गावात एका सधन शेतकरी कुटुंबात सुनिल होन यांचा जन्म दि १८ सप्टेंबर रोजी झाला,प्राथमिक शिक्षण शिर्डी व पुढील शिक्षण चांदेकसारे व कोपरगाव येथुन पुर्ण केले.कुटुंबात समाजसेवेचा वारसा त्यांचे चुलते कै किसनराव नबाजी पा होन यांच्या कडुन मिळाला.शेतकर्याची व मोलमजुरी करणाऱ्या ची मुल शाळा,कॉलेज दुर असल्याने शिक्षणापासुन वंचित राहत होते . हिच गरज आेळखुन सुनिल भाऊ व त्यांच्या सहकार्यानी मिळुन २०१६ साली एक शैक्षणिक संस्था सुरु केली.आज या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल , डाऊच खुर्द या ठिकाणी सुरु आहे.कोपरगाव चे आमदार श्री अशुतोष दादा काळे साहेब यांचे अत्यंत विश्वासु व निष्टावान  सहकारी आहेत.स्कुल च्या माध्यमातुन चांदेकसारे गावात आई तुळजा भवानी माता मंदिर येथे भाविकांना बसण्यासाठी बाकडे,तसेच भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर येथे सी सी टिव्ही कॅमेरे तसेच ख्वाजापिर दर्गाचे तार कंपाउंड,इ कामे स्वखर्चाने केलेले आहे.सुनिल भाऊंच्या मार्गदर्शना खाली जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल च्या सर्व मुलांचा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातुन मोफत विमा उतरविला आहे.असा विमा उतरवनारी जोगेश्वरी राज्यात पहिलीच स्कुल आहे.प्रत्येक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यक्रमात सुनिल भाऊ चा प्रमुख सहभाग असतो.गरीब घरातील जर कोणी मयत झाले तर दशक्रिया विधी साठी ५० किलो साखर मोफत दिली जाते.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुनिल भाऊ च्या माध्यमातुन चांदेकसारे गावातील सर्व वैद्यकिय सेवा देणारे डॉक्टर,नर्स,अंगनवाडी सेविका यांना पी.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव,उरुस,व सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमाला सुनिल भाऊंचा सहभाग असतो.सगळयांना जोडुन ठेवायच्या स्वभावामुळे आज सुनिल होन यांच्या बरोबर असंख्य तरुण सहकारी जोडले गेलेले आहे.एका शेतकरी कुटुंबातुन येवुन जनमानसात आपली वेगळी ओळख खुपच कमी लोकांना बनवता येते.सुनिल होन यांनी आपले स्थान व दर्जा मागील बर्याच वर्षांच्या कामातुन अधोरेखित केले आहे.अशा या तरुन,तडफदार,युवा सेवकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.



श्रीरामपूर - (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय त्वरीत रद्द करुन शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा कांदा निर्यातबंदी झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. सध्या कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात असतांना कांदा पिकातून मिळणारी थोडीशी आर्थिक ताकदही या निर्यातबंदीमुळे कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.केंद्र शासनाने कांदा निर्यात सुरु ठेवावी, अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले. यावेळी अ‍ॅड्.उमेश लटमाळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, पक्षाचे प्रतोद अभिषेक खंडागळे, ‘अशोक’ चे संचालक आदिनाथ झुराळे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते.केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा नसून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असतांना त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. शेत मालालाभाव नसल्यामुळे  शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.कांदा पिक हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे पिक आहे अनेक शेतकऱ्यांनी कांदा खराब होवु लागल्यामुळे आगोदरच विकलेला आहे थोड्या फार शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे भविष्यात भाव मिळेल या आशेने त्यांनी खराब कांदा काढुन पुन्हा चांगला कांदा चाळीत भरला आहे  कांदा निर्यातीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे भाव मिळेल या आशेवर शेतकरी वर्ग असतांना केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यातबंदी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

🔹दोघांनी केली होती रानडुकराची शिकार
बुलडाणा - 16 सेप्टेंबर
बुलडाणा वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करणाऱ्या 2 तसेच शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणाऱ्या 2 असे 4 आरोपींना आज वन विभागाने अटक त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांची जामीन मंजूर केली आहे.
    लॉकडाउन च्या काळात बुलडाणा वन विभागाला माहिती मिळाली की बुलडाणा तालुक्यातील कोलवड गावात अवैधरित्या रानडुकराची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.26 मेला बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्या नेतृत्वात वनपाल राहुल चौहान,दिपक घोरपडे, सुरेश भालेराव,विष्णु काकड,शिला खरात, विलास मेरत, संदीप मडावी,प्रवीण सोनुने,दिपक गायकवाड यांनी कोलवड गावात एका घरात छापा टाकून शिकार केलेल्या रानडुकराचा अंदाजे 60 किलो मांस व इतर साहित्य सह आरोपी अनिल उर्फ नारायण शिंदे रा.शिरपुर व राजेश शिंदे रा.नान्द्रकोळी यांना ताब्यात घेतले होते.तर दूसरी कार्रवाई गिरडा - 1 बिट मध्ये 3 अप्रैल रोजी करण्यात आली होती.या ठीकाणी जंगलात वन्य प्राणयांचा शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे 2 जन 3 जाळे सह मिळून आले होते.आरोपी सुपडा चौहान व प्रभाकर सोनोने दोघे रा.हनवतखेड ता. मोताळा यांना वनरक्षक कैलाश तराळ व प्रशांत नारखेडे यांनी ताब्यात घेतले होते.दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र लॉकडाउन असल्यामुळे आरोपींना समज पत्र देण्यात आले होते.आज दोन्ही प्रकारणातील चार ही आरोपींना अटक करून कोर्टा समक्ष उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.पुढील तपास आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल राहुल चौहान करीत आहे.

🔹2 छोटे वाहनात क्रोसिंग केले जात होते दारुचे बॉक्स
🔸बुलडाणा व मोताळा येथील ते दारू दुकानदार कोण?
बुलडाणा - (कासिम शेख)16 सेप्टेंबर)
नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून इतर दोन वाहनात दारूचे बॉक्स पलटी मारताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज 16 सप्टेंबर रोजी भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले असून तीन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले आहे.ज्या दोन छोटे वाहनात दारूचे बॉक्स टाकले जात होते ते दारू विक्रेते कोण?बिल्टी औरंगाबाद च्या नावाने होती तर भादोला जवळ ही क्रोसिंग का केली जात होती,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
        पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन आयशर वाहन नागपूर हुन औरंगाबाद कडे निघाला होता.सदर दारु मे.निर्मल ट्रेडर्स,सर्वे नं.211,शॉप नं.5,हरसुल सांवगी, औरंगाबाद यांच्या नावाने होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलढाण्याच्या दिशेने निघाला व बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठ्या वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात माळ पलटी मारल्या जात असताना त्या ठीकाणी बुलढाणा एलसीबीचे पीएसआय मुकुंद देशमुख, अनिल भुसारी, भरत जंगले, विजय दराडे व श्रीकांत चिंचोले पोहोचले व त्यांनी वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहनचालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.पलटी मारलेली दारू बुलडाणा येथील 2 व मोताळा येथील एक देशी दारू दुकानावार जात असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा पंचनामा करून आता पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीचे पीआय महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget